Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी शनिवारी पार पडलेल्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी तब्बल ३८८ कोटी १० लाख रुपये खर्च झाले. पहिल्या दिवशी एकूण ७४ खेळाडूंवर यशस्वी बोली लागली. यामध्ये ५४ भारतीय, तर २० विदेशी खेळाडूंनी कमाई केली. मूळचा झारखंडचा मात्र आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून चमकलेला इशान किशान अपेक्षेप्रमाणे सर्वांत महागडा ठरला. मुंबई इंडियन्सने तब्बल १५ कोटी २५ लाख रुपयांची किंमत मोजून किशनला आपल्या ताफ्यात पुन्हा ठेवले. पण, आज १० फ्रँचायझींची खरी कसोटी लागणार आहे. आतापर्यंत त्यांनी मोठ्या खेळाडूंसाठी मोठी रक्कम मोजली आहे आणि त्यांच्या बटव्यातील रक्कमही आता आटली आहे. त्या कमी रक्कमेत त्यांना आता संघबांधणी करण्याचं आव्हान पेलावं लागणार आहे.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच बोलीसाठी दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामचं नाव समोर आलं आणि त्याला २.४ कोटींत सनरायझर्स हैदराबाने त्याला आपल्या ताफ्यात दाखल केले. त्यानंतर अजिंक्य रहाणेचं नाव आलं आणि त्याच्यासाठी फक्त कोलकाता नाइट रायडर्सने बोली लावली. त्यामुळे १ कोटी मुळ किमतीत तो KKR च्या ताफ्यात दाखल झाला. अजिंक्यचा फॉर्म चिंतेचा विषय आहे आणि त्याला ताफ्यात घेण्यासाठी कोणी उत्सुकता दाखवली नाही. अजिंक्यने आयपीएलमध्ये १५१ सामन्यांत ३१.५२च्या सरासरीने ३९४१ धावा केल्या आहेत. त्यात २ शतकं व २८ अर्धशतकांचा समावेश आहे. मागच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यासाठी ४ कोटी मोजले होते. चेतेश्वर पुजारा मात्र अनसोल्ड राहिला. मागच्या लिलावातही त्याच्यावर कोणीच बोली लावली नव्हती, परंतु चेन्नई सुपर किंग्सनं पु्न्हा त्याचं नाव आल्यानंतर त्याला मुळ किमतीत दाखल करून घेतले.
कोलकाता नाईट रायडर्स : श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी, शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे
पहिल्या दिवसअखेर फ्रँचायझींच्या बटव्यात उरलेली रक्कम
- चेन्नई सुपर किंग्स - २०. ४५ कोटी
- दिल्ली कॅपिटल्स - १६.५० कोटी
- गुजरात टायटन्स - १८.८५ कोटी
- कोलकाता नाइट रायडर्स - १२.६५ कोटी
- लखनौ सुपर जायंट्स - ६.९० कोटी
- मुंबई इंडियन्स - २७. ८५ कोटी
- पंजाब किंग्स - २८.६५ कोटी
- राजस्थान रॉयल्स - १२.१५ कोटी
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ९.२५ कोटी
- सनरायझर्स हैदराबाद - २०.१५ कोटी
Web Title: IPL 2022 Mega Auction : Ajinkya Rahane sold to KKR for ₹ 1 crore
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.