Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : Aryan Khan and Suhana Khan are shaken - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी सुरू असलेल्या लिलावाच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक प्रकार घडला. ऑक्शनर ह्युज एडमेड्स ( auctioneer Hugh Edmeades collapses) हे अचानक चक्कर येऊन व्यासपीठावरून खाली कोसळले. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा याच्यावर बोली सुरू असताना हा प्रकार घडला आणि सर्वांचा काळजाचा ठोका चुकला. आयपीएल ऑक्शनसाठी या लिलावात कोलकाता नाइट रायडर्सकडून मालक शाहरूख खान याची कन्या सुहाना व मुलगा आर्यन व सह मालकिण जुही चावलाची कन्या जान्हवी उपस्थित होते. ह्युज एडमेड्स जेव्हा कोसळले तेव्हा सुहाना व आर्यन हे थरथरले... त्यात घाबरलेल्या सुहानाला पाहून चाहतने पाघळले...
कोलकाता नाइट रायडर्सने लिलावाआधी आंद्रे रसेल ( १२ कोटी), वरुण चक्रवर्थी ( ८ कोटी), वेंकटेश अय्यर ( ८ कोटी) , सुनील नरीन ( ६ कोटी) यांना संघात कायम राखले होते. काल त्यांनी श्रेयस अय्यर ( १२.२५ कोटी), नितिश राणा ( ८ कोटी), पॅट कमिन्स ( ७.२५ कोटी), शिवम मावी ( ७.२५ कोटी), शेल्डन जॅक्सन ( ६० लाख) यांना आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. आता त्यांच्या खात्यात १२ कोटी ६५ लाख रुपये शिल्लक आहेत.
पाहा सुहानाची रिअॅक्शन..
ह्युज एडमेड्स हे अचानक जमिनीवर कोसळले. काही वेळाने IPL व्यवस्थापनाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं. त्यांना नक्की काय झालं होतं असा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता. त्यांना Postural Hypotension चा त्रास झाल्याचं IPL कडून स्पष्ट केलं. दरम्यान, प्रथमोपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे IPL व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.