मेगा लिलाव सुरू झाल्यानंतर अवघ्या अडीच तासात एक विचित्र प्रकार घडला. लिलावाच्या दरम्यानच ऑक्शनर ह्यूज एडमेड्स (Hugh Edmeades) यांची तब्येत बिघडली. ते अचानक स्टेजवरून खाली पडले. या अपघातानंतर मेगा लिलाव काही काळ थांबवावा लागला. ह्यूज हे काही वेळाने बरे झाले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पण असा प्रसंग घडल्यावर IPL गव्हर्निंग कौन्सिलने त्यांना विश्रांती देऊन नवीन व्यक्तीला बोलावणं योग्य मानले. शनिवारी बंगळुरूमध्येच असलेल्या चारू शर्मा यांचं नाव सुचवलं गेलं आणि त्यांनी पुढे ऑक्शनची जबाबदारी पार पाडली.
चारू शर्मा यांनी या साऱ्या प्रकाराबद्दल एका ऑनलाइन साईटशी बोलताना सांगितलं की मी त्यावेळी टीव्ही बघत नव्हतो. माझ्या घरी मी काही पाहुण्यांसोबत जेवत होतो. नेमका त्याच वेळी IPL गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रजेश पटेल यांचा फोन आला. ते म्हणाले की सगळं काम बाजूला ठेव आणि लगेच निघून इकडे ये. त्यांनी पत्ता सांगितला आणि इमर्जन्सी परिस्थिती असल्याचं सांगितलं. मी घरातून ITC गार्डनिया हॉटेलकडे निघालो पण मला काहीही माहिती नव्हती. घराच्या जवळच हॉटेल असल्याने मी पटकन पोहोचलो.
पुढे त्यांनी सांगितलं की हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर चारू शर्मा यांना या संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी लिलावाची तयारी सुरू केली. १५ मिनिटांत त्यांनी लिलावाची सगळी माहिती घेतली. काय झालंय आणि पुढे काय करायचं आहे, याचा नीट अभ्यास करून त्यांनी लिलाव सुरू केला व समर्थपणे सांभाळला, असंही त्यांनी सांगितलं.
Web Title: IPL 2022 Mega Auction Auctioneer Charu Sharma tells story of single phone call when Hugh Edmeades collapses on the spot
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.