Join us  

IPL 2022 Mega Auction: आयपीएल ऑक्शनसाठी BCCIची 'मेगा' तयारी; फ्रँचायझींसाठी तयार केले १० नियम, जे तुम्हालाही माहीत असायला हवेत

IPL 2022 Mega Auction:  BCCI asks all 10 franchises to follow these 10 Rules - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी १२ व १३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे मेगा ऑक्शन होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 1:37 PM

Open in App

IPL 2022 Mega Auction:  BCCI asks all 10 franchises to follow these 10 Rules - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी १२ व १३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे मेगा ऑक्शन होणार आहे.   IPL 2022  Mega Auction साठी नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी केवळ ५९० खेळाडूंच्या नावांचा समावेश अंतिम यादीत करण्यात आला आहे. या खेळाडूंमध्ये ३७० भारतीय आणि २२० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. पण, या मेगा ऑक्शनसाठी बीसीसीआयनं १० फ्रँचायझींसाठी काही नियम तयार केले आहेत. जे क्रिकेट चाहत्यांनी हे नियम जाणून घ्यायला हवेत

  • आयपीएल २०२२ ऑक्शन हे पूर्णपणे बायो-बबलमध्ये पार पडणार आहे
  •  मेगा ऑक्शनमध्ये सहभाग घेणाऱ्या फ्रँचायझींच्या प्रतिनिधिंची कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असायला हवा आणि ९, १० , ११ तारखेला त्यांची RT-PCR टेस्ट निगेटीव्ह यायला हवी. बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमकडून ती चाचणी केली जाईल
  • यंदाच्या ऑक्शनमध्ये Right to Match (RTM) हा पर्याय नसणार आहे.  
  • मुदत संपल्यानंतर कोणताही  संघ त्यांच्या जुन्या खेळाडूला रिटेन करू शकत नाही. याचा सर्वाधिक फटका मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या मोठ्या संघाना बसलेला पाहायला मिळतोय.  
  • प्रत्येक फ्रँचायझीला या ऑक्शनसाठी प्रत्येकी ९० कोटी बजेट दिले गेले आहेत आणि त्यापैकी ८० कोटी हे खेळाडूंवर खर्च करायला हवेत.
  •  मागील १५ दिवसांत परदेश दौरा करून आयपीएलसाठी भारतात आलेल्या खेळाडूंना ७ दिवस सक्तीच्या विलगिकरणात रहावं लागेल आणि दोन वेळा त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह यायला हवा.  
  •  मेगा ऑक्शनसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर बीसीसीआयचे लक्ष आहे आणि त्यांच्यात कोरोना लक्षणं दिसतात का याकडे त्यांची बारीक नजर आहे.  
  •  कोरोना चाचणी पहाटे १२ ते सकाळी ७ या कालावधीत केली जाईल. जेणेकरून आयपीएल ऑक्शनमध्ये काही अडथळा येणार नाही. कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह येईपर्यंत त्या सदस्याला रुममध्येच रहावे लागणार आहे.  
  • कोरोना चाचणी निगेटीव्ह आलेल्या आणि विलगिकरणाचे नियम पाळणाऱ्या व्यक्तिलाच लिलावात सहभाग घेता येणार आहे.  
  • लिलावात सहभागी होणाऱ्या प्रत्येकानं कोरोना लसीसंदर्भाची सर्व माहिती द्यायला हवी आणि सर्व सदस्यांनी माक्स घालणे अनिवार्य आहे.  
टॅग्स :आयपीएल २०२१आयपीएल लिलावबीसीसीआय
Open in App