IPL 2022 Mega Auction : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ पर्वासाठी होणाऱ्या Mega Auction ला दोन एक दिवस शिल्लक असताना मोठा बॉम्ब टाकला. बीसीसीआयने गुरुवारी १३ खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर केली. यात ज्या खेळाडूंची नावं आहे त्यांच्या गोलंदाजीची शैली अवैध आहे आणि त्यांच्यावर गोलंदाजी करण्याची बंदी घातली जाईल किंवा त्यांच्यावर बारीक लक्ष असेल. यामध्ये अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या विकी ओस्तवाल ( Vicky Ostwal) याच्यासह विदर्भचा दर्शन नळकांडे, सौराष्ट्रचा फिरकीपटू धर्मेंद्रसिंग जडेजा यांचा समावेश आहे.
या १३ खेळाडूंपैकी ३ खेळाडूंवर गोलंदाजी करण्यास पूर्णपणे बंदी घातली गेली आहे, तर १० जणांवर बारीक लक्ष असणार आहे. त्यांच्या गोलंदाजीची शैली तपासली जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर बंदी घालायची की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाईल. बंदी घालण्यात आलेल्या तीन खेळाडूंमध्ये मनिष पांडे, कर्नाटकचा केएल श्रीजिथ आणि झारखंडचा इशांक जग्गी यांचा समावेश आहे. त्यामुळेच मनिष पांडे व इशांक जग्गी यांनी आयपीएल ऑक्शनसाठी त्यांचे नाव फलंदाज म्हणून नोंदवले आहे, तर केएल श्रीजिथ यष्टिंमागे दिसणार आहे. त्यामुळे त्यांच्यावरील बंदी आयपीएल फ्रँचायझींसाठी डोकेदुखी ठरणार नाही.
उर्वरित १० खेळाडूंमध्ये विकी ओत्सवाल ( महाराष्ट्र), दर्शन नळकांडे ( विदर्भ), धर्मेंद्र सिंग जडेजा ( सौराष्ट्र), अपूर्व वानखडे ( विदर्भ), सुदीप चॅटर्जी ( बंगाल), आर समर्थ ( कर्नाटक), अरपीत गुलेरीया ( हिमाचल प्रदेश), जश बिस्ता ( उत्तराखंड) आणि आझीम काझी ( महाराष्ट्र)