IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी १२ व १३ फेब्रुवारीला ५९० खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. आयपीएलच्या या पर्वात १० संघ मैदानावर उतरणार असल्यामुळे मेगा ऑक्शनमध्ये बरेच मोठी नावं आहेत. यंदा अनेक दिग्गज खेळाडू मैदानात असल्यानं फ्रँचायझी कोट्यवधी पैसे ओतण्याच्या तयारीत आहेत. त्यात काही असे खेळाडू आहेत की जे २० कोटी घेऊन जाऊ शकतील.
यंदाच्या लिलावात एकूण १२१४ खेळाडूंनी नोंदणी केली. त्यातून ५९० खेळाडूंचा अंतिम यादीत समावेश झाला. या यादीमध्ये ३७० भारतीय आणि २२० विदेशी क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत महागडे ठरलेले भारतीय खेळाडू कोण ते जाणून घेऊयात...
- युवराज सिंग - १६ कोटी ( दिल्ली डेअरडेव्हिल्स, आयपीएल २०१५ ऑक्शन)
- युवराज सिंग - १४ कोटी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, आयपीएल २०१४ ऑक्शन)
- दिनेश कार्तिक - १२. ५ कोटी ( दिल्ली डेअरडेव्हिल्स, आयपीएल २०१४ ऑक्शन)
- जयदेव उनाडकत - ११.५ कोटी ( राजस्थान रॉयल्स, आयपीएल २०१८ ऑक्शन)
- गौतम गंभीर - ११.०४ कोटी ( कोलकाता नाइट रायडर्स, आयपीएल २०११ ऑक्शन)
- लोकेश राहुल - ११ कोटी ( किंग्स इलेव्हन पंजाब, आयपीएल २०१८ ऑक्शन)
- मनिष पांडे - ११ कोटी ( सनरायझर्स हैदराबाद, आयपीएल २०१८ ऑक्शन )
- दिनेश कार्तिक - १०.५ कोटी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, आयपीएल २०१५ ऑक्शन)
- रवींद्र जडेजा - ९.८ कोटी ( चेन्नई सुपर किंग्स, आयपीएल २०१२ ऑक्शन )
- रॉबिन उथप्पा - ९.५ कोटी ( पुणे वॉरियर्स, आयपीएल २०११ ऑक्शन )