IPL 2022 Mega Auction : BCCI नं नुकतेच इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावासाठी ५९० खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली. यात खेळाडूंमध्ये ३७० भारतीय आणि २२० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यापैकी अफगाणिस्तान - १७, ऑस्ट्रेलिया - ४७, बांगलादेश - ५, इंग्लंड - २४, आयर्लंड - ५, न्यूझीलंड २४, दक्षिण आफ्रिका - ३३, श्रीलंका - २३, वेस्ट इंडिज- ३४, झिम्बाब्वे - १, नामिबिया - ३, नेपाळ - १ , स्कॉटलंड २, अमेरिका - १ अशी परदेशी खेळाडूंची वर्गवारी आहे. पण, बीसीसीआयनं जाहीर केलेल्या अंतिम यादीत एक चूक झाली आहे. बीसीसीआयनं जाहीर केलेल्या खेळाडूंमध्ये ४७ खेळाडू ऑस्ट्रेलिया व २४ खेळाडू इंग्लंडचे आहेत. पण, त्यांच्या उपलब्धतेबाबत साशंकता आहे.
''आमच्याकडे ऑक्शनसाठीची अंतिम यादी आहे आणि ही जमेची बाब आहे. त्यानं आम्हाला प्लानिंक करण्यास मदत मिळणार आहे, परंतु ऑक्शनचा दिवस महत्त्वाचा आहे,''असे फ्रँचायझिमधील अधिकाऱ्यानं सांगितले. इंग्लंडचे खेळाडू मे महिन्याच्या अखेरीस माघार घेण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे प्ले-ऑफ लढतीत ते खेळतील की नाही याबाबत शंका आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा संघ २९ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. त्यामुळे तेही सुरूवातीच्या सामन्याला मुकणार आहेत. त्यामुळे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्या खेळाडू किती सामने खेळतीय, यावर प्रश्नचिन्ह असल्यानं
कोणाच्या ताफ्यात कोणते खेळाडू अन् खात्यात किती शिल्लक
- पंजाब किंग्स - मयांक अग्रवाल ( १४ कोटी), अर्षदीप सिंग (४ कोटी) ; शिल्लक रक्कम - ७२ कोटी
- सनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन ( १४ कोटी), अब्दुल समद ( ४ कोटी), उम्रान मलिक ( ४ कोटी); शिल्लक रक्कम - ६८ कोटी
- राजस्थान रॉयल्स - सजू सॅमसन ( १४ कोटी), जोस बटलर ( १० कोटी), यशस्वी जैस्वाल ( ४ कोटी); शिल्लक रक्कम - ६२ कोटी
- लखनौ - लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) व रवी बिश्नोई ( ४ कोटी); शिल्लक रक्कम - ५८ कोटी
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - विराट कोहली ( १५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( ११ कोटी), मोहम्मद सिराज ( ७ कोटी); शिल्लक रक्कम - ५७ कोटी
- अहमदाबाद - हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी); शिल्लक रक्कम - ५२ कोटी
- चेन्नई सुपर किंग्स - रवींद्र जडेजा ( १६ कोटी), महेंद्रसिंग धोनी ( १२ कोटी), ऋतुराज गायकवाड( ६ कोटी) , मोईन अली (८ कोटी); शिल्लक रक्कम - ४८ कोटी
- मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा ( १६ कोटी), जसप्रीत बुमराह ( १४ कोटी), किरॉन पोलार्ड ( ६ कोटी), सूर्यकुमार यादव ( ८ कोटी); शिल्लक रक्कम - ४८ कोटी
- कोलकाता नाइट रायडर्स - आंद्रे रसेल ( १२ कोटी), वरुण चक्रवर्थी ( ८ कोटी), वेंकटेश अय्यर ( ८ कोटी) , सुनील नरीन ( ६ कोटी); शिल्लक रक्कम - ४८ कोटी
- दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत ( १६ कोटी), अक्षर पटेल ( १२ कोटी), पृथ्वी शॉ ( ८ कोटी), अॅनरीच नॉर्ट्जे ( ६ कोटी); शिल्लक रक्कम - ४७ कोटी