Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी सुरू असलेल्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) इशान किशननंतर ताफ्यात घेतलेल्या खेळाडूची चर्चा रंगलीय.. मुंबईने इशानसाठी सर्वाधिक १५.२५ कोटी मोजले. त्यानंतर त्यांनी 'Baby AB' साठी तगडी रक्कम मोजून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. नुकत्याच पार पडलेल्या अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या युवा फलंदाजाने सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला होता. कोण आहे हा खेळाडू आणि त्याला का म्हणताता बेबी एबी?
डेवॉल्ड ब्रेव्हिस ( Dewald Brevis ) असे या खेळाडूचे नाव आहे. नुकत्याच पार पडलेल्या अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा या युवा फलंदाज सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. आयपीएल ऑक्शनमध्ये २० लाख मुळ किमतीच्या खेळाडूंमध्ये त्याने नाव नोंदवले होते आणि पंजाब किंग्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्यात त्याच्यासाठी कडवी टक्कर पाहायला मिळाली, परंतु मुंबई इंडियन्सने एन्ट्री घेत युवा खेळाडूला ३ कोटींमध्ये आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.
एबी डिव्हिलियर्सचा ( AB de Villiers) जबरा फॅन असलेला आणि त्याच्याचसारखी ३६० डिग्री फलंदाजी करणाऱ्या ब्रेव्हिसला त्याचे मित्र व सहकारी Baby AB नावाने बोलवतात... १८ वर्षीय ब्रेव्हिसने वेस्ट इंडिज येथे झालेल्या Under-19 World Cup स्पर्धेत त्याने ६ सामन्यात सर्वाधिक ५०६ धावा केल्या. त्यात दोन शतकांचा आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्यात त्याने भारताविरुद्ध ६५ धावांची खेळी केली. त्यानंतर उंगाडाविरुद्ध १०४ धावा ( ११० चेंडू) व २-१८ वि. यूगांडा, ९६ धावा ( १२२ चेंडू) वि. आयर्लंड, ९७ धावा ( ८८ चेंडू) व २-४० वि. इंग्लंड, ६ धावा व १-५२ वि. श्रीलंका आणि १३८ धावा वि. बांगलादेश अशी कामगिरी केली होती.
ऑक्शनआधी त्यानं RCB कडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. विराट कोहलीची आक्रमकता आवडते असेही तो म्हणाला होता. २९ एप्रिल २००३ मध्ये जोहान्सबर्ग येथील त्याचा जन्म. त्याने आतापर्यंत ३ ट्वेंटी-२० सामन्यांत ८५ धावा केल्या आहेत