IPL 2022: आयपीएल लिलावाच्या ब्रीफिंगमध्ये दिसले आर्यन अन् सुहाना खान!, 'सीईओ'सोबत 'गुफ्तगू'

IPL 2022: आयपीएलच्या मेगा लिलावाला थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या मेगा लिलावासाठी संघांचे मालक, मेंटॉर आणि प्रशिक्षक बंगळुरूत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 12:00 PM2022-02-12T12:00:59+5:302022-02-12T12:03:48+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2022 mega auction kolkata knight rider aryan khan and suhana khan spotted in mega auction table | IPL 2022: आयपीएल लिलावाच्या ब्रीफिंगमध्ये दिसले आर्यन अन् सुहाना खान!, 'सीईओ'सोबत 'गुफ्तगू'

IPL 2022: आयपीएल लिलावाच्या ब्रीफिंगमध्ये दिसले आर्यन अन् सुहाना खान!, 'सीईओ'सोबत 'गुफ्तगू'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022: आयपीएलच्या मेगा लिलावाला थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या मेगा लिलावासाठी संघांचे मालक, मेंटॉर आणि प्रशिक्षक बंगळुरूत आहेत. कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान देखील उपस्थित आहेत. मेगा लिलावाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या ब्रीफिंग बैठकीत आर्यन आणि सुहाना देखील उपस्थित होते. 

कोलकाता नाइट रायडर्सच्या टेबलवर संघाचे सीईओ वेंकी मैसूर सोबतच बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि सुहाना खान उपस्थित होते. ब्रीफिंगवेळी आर्यन खान संघाच्या सीईओंसोबत चर्चा करत होता. आर्यन दिसताच कोलकाताच्या चाहत्यांनी सोशल मीडियात फोटो शेअर करण्यास सुरुवात केली. कोलकाता नाइट रायडर्सकडून यंदा श्रेयस अय्यरवर मोठी बोली लावली जाऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

कोलकातानं ३० नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या रिटेंन्शनमध्ये युवा खेळाडूंना संधी दिली आहे. कोलकातानं वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांना रिटेन केलं आहे. गेल्या सीझनमध्ये संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवणाऱ्या कर्णधार इऑन मॉर्गनला मात्र संघानं रिलीज केलं आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघ श्रेयस अय्यरला आपल्या संघात कर्णधार म्हणून दाखल करून घेण्यास उत्सुक आहे. 

Web Title: ipl 2022 mega auction kolkata knight rider aryan khan and suhana khan spotted in mega auction table

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.