Liam Livingstone, IPL 2022 Mega Auction : पाकिस्तान लीगचे गुणगान गाणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूसाठी पंजाब-हैदराबाद यांच्यात जुंपली; सर्वाधिक बोली लागताच Kavya Maran निराश झाली 

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates : पहिल्या दिवशी एकूण ७४ खेळाडूंवर यशस्वी बोली लागली. यामध्ये ५४ भारतीय, तर २० विदेशी खेळाडूंनी कमाई केली. लिलावाच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लाएम लिव्हिंगस्टोन ( Liam Livingstone ) याच्यासाठी सर्वात मोठी बोली लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 12:51 PM2022-02-13T12:51:31+5:302022-02-13T13:12:14+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022  Mega Auction : Liam Livingstone becomes the highest-paid Englishman, he e was sold to PBKS for INR 11.50 Crores, SRH Kavya Maran feel sad | Liam Livingstone, IPL 2022 Mega Auction : पाकिस्तान लीगचे गुणगान गाणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूसाठी पंजाब-हैदराबाद यांच्यात जुंपली; सर्वाधिक बोली लागताच Kavya Maran निराश झाली 

Liam Livingstone, IPL 2022 Mega Auction : पाकिस्तान लीगचे गुणगान गाणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूसाठी पंजाब-हैदराबाद यांच्यात जुंपली; सर्वाधिक बोली लागताच Kavya Maran निराश झाली 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी शनिवारी पार पडलेल्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी तब्बल ३८८ कोटी १० लाख रुपये खर्च झाले. पहिल्या दिवशी एकूण ७४ खेळाडूंवर यशस्वी बोली लागली. यामध्ये ५४ भारतीय, तर २० विदेशी खेळाडूंनी कमाई केली. लिलावाच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लाएम लिव्हिंगस्टोन ( Liam Livingstone ) याच्यासाठी सर्वात मोठी बोली लागली. आयपीएल लिलाव २०२२मध्ये सर्वात रक्कम कमावणारा तो इंग्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात त्याच्यासाठी चुरस पाहायला मिळाली. ( Liam Livingstone becomes the highest-paid Englishman of the IPL 2022 auction after a five-way bidding war)  

अजिंक्य रहाणेला कोलकाताचा आधार... 
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच बोलीसाठी दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामचं नाव समोर आलं आणि त्याला २.६ कोटींत सनरायझर्स हैदराबाने त्याला आपल्या ताफ्यात दाखल केले. त्यानंतर अजिंक्य रहाणेचं नाव आलं आणि त्याच्यासाठी फक्त कोलकाता नाइट रायडर्सने बोली लावली. त्यामुळे १ कोटी मुळ किमतीत तो KKR च्या ताफ्यात दाखल झाला. अजिंक्यचा फॉर्म चिंतेचा विषय आहे आणि त्याला ताफ्यात घेण्यासाठी कोणी उत्सुकता दाखवली नाही. अजिंक्यने आयपीएलमध्ये १५१ सामन्यांत ३१.५२च्या सरासरीने ३९४१ धावा केल्या आहेत. त्यात २ शतकं व २८ अर्धशतकांचा समावेश आहे. मागच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यासाठी ४ कोटी मोजले होते. 

लाएम लिव्हिंगस्टोनसाठी मोठी बोली...
कालच लिव्हिंगस्टोनने पाकिस्तान सुपर लीगचे गुणगान गायले होते. तो सध्या तिथे खेळत आहे.. त्याच्यासाठी आयपीएल लिलावात लागलेली बोली सर्वांना धक्का देणारी ठरली.  सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात इंग्लंडच्या खेळाडूला ताफ्यात घेण्यासाठी अखेरपर्यंत चुरस पाहायला मिळाली. पण, बजेट सांभाळण्याची कसरत असल्याने SRHने माघार घेतली आणि PBKS ने त्याला ११.५० कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. लिव्हिंगस्टोनने ट्वेंटी-२०त १६४ सामन्यांत ४०९५ धावा केल्या आहेत आणि त्यात २ शतकं व २३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नावावर ६७ विकेट्सही आहेत. आयपीएलमध्ये ९ सामन्यांत ११३ धावा केल्या आहेत. 

१३८ चेंडूंत चोपलेल्या ३५० धावा
२०१५ साली लाएम लिव्हिंगस्टोन याने नँटविच सीसी क्लबकडून खेळताना १३८ चेंडूंत ३५० धावा केल्या होत्या. त्यात ३४ चौकार व २७ षटकारांचा समावेश होता. Royal London Club Championship स्पर्धेतील या सामन्यात नँटविच संघाने ४५ षटकांत ७ बाद ५७९ धावा कुटल्या होत्या.  

Web Title: IPL 2022  Mega Auction : Liam Livingstone becomes the highest-paid Englishman, he e was sold to PBKS for INR 11.50 Crores, SRH Kavya Maran feel sad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.