IPL 2022 Mega Auction : MS Dhoni तुझ्यापेक्षा कमी पैसे घेतो, लोकं आता चर्चा करतील; मोहम्मद कैफच्या गुगलीवर दीपक चहर म्हणाला... 

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) रवींद्र जडेजाला सर्वाधिक १६ कोटी देऊन संघात कायम राखले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 03:14 PM2022-02-13T15:14:07+5:302022-02-13T15:14:54+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022  Mega Auction : Mohammad Kaif - "MS Dhoni is taking 12cr and you will be taking 14cr, people will talk about it alot", Deepak Chahar epic reply | IPL 2022 Mega Auction : MS Dhoni तुझ्यापेक्षा कमी पैसे घेतो, लोकं आता चर्चा करतील; मोहम्मद कैफच्या गुगलीवर दीपक चहर म्हणाला... 

IPL 2022 Mega Auction : MS Dhoni तुझ्यापेक्षा कमी पैसे घेतो, लोकं आता चर्चा करतील; मोहम्मद कैफच्या गुगलीवर दीपक चहर म्हणाला... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने ( Chennai Super Kings) रवींद्र जडेजाला सर्वाधिक १६ कोटी देऊन संघात कायम राखले. त्यानंतर , महेंद्रसिंग धोनी ( १२ कोटी), ऋतुराज गायकवाड( ६ कोटी) , मोईन अली (८ कोटी) यांनाही त्यांनी रिटेन केले. महेंद्रसिंग धोनीनं इथे मनाचा मोठेपणा दाखवताना जडेजाला पहिल्या पंक्तिचा मान देऊन स्वतः पगारात कपात करून घेतली. आता त्यात आणखी एक खेळाडू धोनीपेक्षा अधिक रक्कम घेणारा CSK च्या ताफ्यात दाखल झाला आहे. 

कितीची लागली बोली? - दीपक चहर गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळला होता. त्यानंतर त्याला महालिलावाआधी करारमुक्त करण्यात आले. त्यामुळे चेन्नईचा संघ त्याच्यावर बोली लावेल अशी अपेक्षा नव्हती. पण मूळ ८० लाखांच्या रकमेवरून त्याची बोली सुरू झाली आणि बोली वाढवण्यास सुरूवात झाली. अखेर दीपक चहरला तब्बल १४ कोटींच्या बोलीवर चेन्नईच्या संघानेच पुन्हा आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. २०१८ पासून दीपक चहर चेन्नई सुपर किंग्सकडे आहे. त्याने आतापर्यंत ६३ सामन्यांत ५९ विकेट्स घेतल्या आहेत. १३ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 

  • मोहम्मद कैफने विचारलं - महेंद्रसिंग धोनी १२ कोटी घेतो आणि तुला आता १४ कोटी मिळणार आहेत. याबाबत लोकं आता बरीच चर्चा करतील. 
  • दीपक चहर म्हणाला - जर ते महेंद्रसिंग धोनीच्या हातात असतं तर त्यानं एक रुपयाही घेतला नसता. CSKने त्याला पहिल्या पंक्तिचा मान दिला होता, परंतु त्यानं स्वतःला दुसऱ्या पंक्तित ठेवले. दीपक पुढे म्हणाला, १२ ते १३ कोटीपर्यंत बोली लागल्यानंतर मला वाटलं आता थांबायला हवं होतं, कारण चांगला संघ तयार करण्यासाठी CSK कडे पैसे बाकी राहणे महत्त्वाचे होते.  २०१८ मध्ये जेव्हा मी श्रीनिवासन सरांना भेटलो तेव्हा त्यांनी मला सांगितले होते, की यापुढे तू कायम CSK कडूनच खेळणार.

 

चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात कोण?

  • केएम आसीफ ( २० लाख), दीपक चहर ( १४ कोटी), महीश थीक्साना ( ७० लाख), अंबाती रायुडू ( ६.७५ कोटी), तुषार देशपांडे ( २० लाख), शिवम दुबे ( ४ कोटी), ड्वेन ब्राव्हो ( ४.४० कोटी), रॉबीन उथप्पा ( २ कोटी) 
  • शिल्लक रक्कम - १५.७५ कोटी 

 

Web Title: IPL 2022  Mega Auction : Mohammad Kaif - "MS Dhoni is taking 12cr and you will be taking 14cr, people will talk about it alot", Deepak Chahar epic reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.