Kavya Maran vs Ambani, IPL 2022 Mega Auction : Mumbai Indiansचा डाव काव्या मारनने त्यांच्यावरच उलटवला, म्हणून Ishan Kishan त्यांना महागात पडला, Video

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates : आयपीएलच्या आगामी १५व्या पर्वासाठी शनिवारी पार पडलेल्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी तब्बल ३८८ कोटी १० लाख रुपये खर्च झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 09:25 AM2022-02-13T09:25:57+5:302022-02-13T09:36:11+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Mega Auction : Mumbai Indians bring back Ishan Kishan for a whopping INR 15.25 Crore, SRH Co-owner Kavya Maran give tough fight, Watch video | Kavya Maran vs Ambani, IPL 2022 Mega Auction : Mumbai Indiansचा डाव काव्या मारनने त्यांच्यावरच उलटवला, म्हणून Ishan Kishan त्यांना महागात पडला, Video

Kavya Maran vs Ambani, IPL 2022 Mega Auction : Mumbai Indiansचा डाव काव्या मारनने त्यांच्यावरच उलटवला, म्हणून Ishan Kishan त्यांना महागात पडला, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates : आयपीएलच्या आगामी १५व्या पर्वासाठी शनिवारी पार पडलेल्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी तब्बल ३८८ कोटी १० लाख रुपये खर्च झाले. पहिल्या दिवशी एकूण ७४ खेळाडूंवर बोली लागली. यामध्ये ५४ भारतीय, तर २० विदेशी खेळाडूंनी कमाई केली. मूळचा झारखंडचा मात्र आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians) चमकलेला इशान किशान ( Ishan Kishan) अपेक्षेप्रमाणे सर्वांत महागडा ठरला. मुंबई इंडियन्सने तब्बल १५ कोटी २५ लाख रुपयांची किंमत मोजून किशनला आपल्या ताफ्यात पुन्हा ठेवले. पण, इशान किशनच्या या शर्यतीत सनरायझर्स हैदराबादची सह मालकिण काव्या मारन ( Kavya Maran ) हिनं मुंबई इंडियन्सचे मालक अंबानी यांना कडवी टक्कर दिली. मुंबई इंडियन्सचा डाव तिने त्यांच्यावरच उलटवला... पाहा नेमकं काय झालं?

लिलावात मुंबई इंडियन्सने पहिला खेळाडू खरेदी केला तो इशान किशन... ऑक्शनमध्ये इशानचं नाव येईपर्यंत मुंबई इंडियन्स बघ्याच्या भूमिकेत होते. एखाद्या खेळाडूवर बोली लागेल असे दिसत असताना मुंबई इंडियन्स मुद्दाम ऑक्शन पॅडल उचलून त्या खेळाडूचा भाव वाढवत होते. अन्य फ्रँचायझींचं बजेट कोलमडून टाकण्याचा डाव होता आणि त्यात ते काही अंशी यशस्वी झाले. मुंबई इंडियन्स इशान किशनला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी कितीही रक्कम मोजतील, हे सर्वांनाच माहित होते आणि त्यासाठी मुंबईने पैसे राखून ठेवले होते.

इशान किशनवर बोली सुरू झाली तेव्हा...
 

दोन कोटी मुळ किंमत असलेल्या इशानची बोली सुरू होताच मुंबई इंडियन्सने ऑक्शन पॅडल उभा केला. त्यानंतर पंजाब किंग्सनं बोली लावण्यास  सुरूवात केली. पंजाब किंग्सने ७.७५ कोटीपर्यंत इशानचा भाव वाढवला. त्यानंतर गुजरात टायटन्स शर्यतीत उतरले आणि त्यांनी १२ कोटीपर्यंत इशानसाठी बोली लावली. आता इशान आपलाच असे मुंबई इंडियन्सला वाटत असताना SRHची मालकिण काव्या मारन शर्यतीत सहभागी झाली आणि तिने मुंबई इंडियन्सच्या फॅन्सचं टेंशन वाढवले. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत जी स्ट्रॅटेजी वापरून अन्य खेळाडूंची किंमत वाढवली. त्याचाच वापर करून काव्या मारनने इशानची किंमत १५ कोटींवर नेऊन ठेवली आणि मुंबईला काही करून १५.२५ कोटी मोजून इशानला ताफ्यात घ्यावे लागले. 

मुंबई इंडियन्स 

  • रिटेन केलेले खेळाडू - रोहित शर्मा ( १६ कोटी), जसप्रीत बुमराह ( १४ कोटी), किरॉन पोलार्ड ( ६ कोटी), सूर्यकुमार यादव ( ८ कोटी); शिल्लक रक्कम - २७ कोटी ८५ लाख 
  • काल खरेदी केलेले खेळाडू - इशान किशन ( १५.२५ कोटी), बसील थम्पी ( ३० लाख), मुरूगन अश्विन ( १.६० कोटी), डेवॉल्ड ब्रेव्हिस ( ३ कोटी) 

पाहा व्हिडीओ..

Web Title: IPL 2022 Mega Auction : Mumbai Indians bring back Ishan Kishan for a whopping INR 15.25 Crore, SRH Co-owner Kavya Maran give tough fight, Watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.