IPL 2022 Auction मध्ये फ्रँचायझींनी अनेक युवा खेळाडूंवर बोली लावली. काही खेळाडू चांगली रक्कम मिळवण्यात यशस्वी झाले तर काही मूळ किंमतीसह विकले गेले. असाच एक खेळाडू म्हणजे Mumbai Indiansकडून खेळलेला रसिक सलाम. IPL मध्ये जम्मू-काश्मीरमधील काही मोजके खेळाडू निवडले गेले त्यापैकी रसिक हा एक खेळाडू आहे. २०१८ ला त्याला काश्मीरच्या संघात स्थान मिळालं आणि नंतर त्याचं नशिबच पालटलं.
रसिकला यंदाच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्या मूळ किमतीत (२० लाख) विकत घेतले आहे. रसिक आयपीएल संघाचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तो यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाचाही भाग होता. २०१९ साली तो मुंबई इंडियन्सकडून एक सामना खेळला होता. त्या सामन्यात चार षटकं टाकत त्याने ४२ धावा दिल्या होत्या. विशेष म्हणजे त्यावर्षी मुंबई इंडियन्सने आयपीएलचं विजेतेपदही मिळवलं होतं. मुंबईने रसिकला २० लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतलं होतं.
IPL खेळण्याआधी भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने २०१८ साली त्याला जम्मू-काश्मीरच्या वरिष्ठ संघात संधी दिली होती. पठाण हा त्यावेळी जम्मू-काश्मीरचा प्रशिक्षक आणि कर्णधार होता. त्यानंतर त्याला IPL मध्ये संधी मिळाली. पण जून २०१९ मध्येच वयचोरीच्या आरोपामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. बंदीच्या काळात तो मुंबईतच राहिला आणि त्याची काळजी मुंबई इंडियन्सने घेतली. गेल्या वर्षी जूनमध्ये त्याच्यावरील बंदी संपुष्टात आली होती. त्यानंतर तो आपल्या राज्याच्या २५ वर्षांखालील संघात परतला.
यंदाच्या वर्षीदेखील त्याच्यावर बोली लावण्यात आली. पण मुंबईने त्याच्यावर बोली लावली नाही. तो यंदा IPL 2022 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या जर्सीत खेळताना दिसणार आहे.
Web Title: IPL 2022 Mega Auction Mumbai Indians Cricketer faced Cricket Ban by BCCI and recently sold to another team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.