IPL 2022 Mega Auction: Mumbai Indiansने शोधला Hardik Pandyaला पर्याय! 'हा' धिप्पाड खेळाडू बजावणार 'फिनिशर'ची भूमिका

६ फूट ५ इंचाच्या धिप्पाड खेळाडूने बीग बॅश लीग आणि पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा गाजवल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 05:30 PM2022-02-13T17:30:50+5:302022-02-13T17:31:12+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Mega Auction Mumbai Indians finds replacement for Hardik Pandya as tall all rounder Tim David joins as Finisher in Owner Neeta Ambani Group | IPL 2022 Mega Auction: Mumbai Indiansने शोधला Hardik Pandyaला पर्याय! 'हा' धिप्पाड खेळाडू बजावणार 'फिनिशर'ची भूमिका

IPL 2022 Mega Auction: Mumbai Indiansने शोधला Hardik Pandyaला पर्याय! 'हा' धिप्पाड खेळाडू बजावणार 'फिनिशर'ची भूमिका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Mega Auction, Mumbai Indians Replacement for Hardik Pandya: भारताचा धडाकेबाज खेळाडू हार्दिक पांड्या याला मेगालिलावाआधी मुंबई इंडियन्स संघाने करारमु्क्त केलं. मेगालिलावात त्याला संघात विकत घेतलं जाईल अशी चर्चा होती. पण गुजरात टायटन्स संघाने त्याला आधीच आपल्या संघात घेत कर्णधारपदी विराजमान केलं. त्यामुळे मुंबईकडे हार्दिकच्या जागी तडाखेबाज फिनिशर कोण येणार, याकडे साऱ्यांचे लक्ष असताना मुंबईने दुसऱ्या दिवशीच्या लिलावात मोठा डाव खेळला. टीम डेव्हिड (Tim David) या ६ फूट ५ इंच धिप्पाड खेळाडूला संघात स्थान दिलं.

टीम डेव्हिड हा सिंगापूरचा क्रिकेटपटू असून त्याने नुकत्याच झालेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये तुफान फटकेबाजी केली. त्याने PSL मध्ये 28*(16), 71(29), 51*(19) आणि 34(18) अशी फटकेबाजी केली. त्याचा बेधडक खेळ पाहूनच मुंबई इंडियन्सने त्याच्यावर ८ कोटी २५ लाखांचा डाव खेळला. सिंगापूर संघाला अजूनही कसोटी व वन डे संघाचा दर्जा मिळालेला नाही. सिंगापूरचा हा खेळाडू आयपीएल खेळला आणि आयपीएल खेळणारा तो सिंगापूरचा पहिलाच खेळाडू ठरला होता. डेव्हिडने १५८पेक्षा अधिक स्ट्राईक रेटनं १४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ५५८ धावा केल्या आहेत. त्यानं एकूण ४९ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत आणि त्यात बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग मधील सामन्यांचा समावेश आहे. त्यात त्यानं ११७१ धावा केल्या आहेत.

बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्स आणि पर्थ स्कॉर्चर्स संघाचे त्यानं प्रतिनिधित्व केले आहे. नुकत्याच झालेल्या रॉयल लंडन कप स्पर्धेत त्यानं सरे क्लबचे प्रतिनिधित्व करताना लिस्ट ए क्रिकेटमधील दोन शतकं झळकावली. त्यानं तीन सामन्यांत 140*(70), 52*(38) & 102(73) अशा धावा कुटल्या आहेत. त्याच्या समावेशनं RCBच्या मधळ्या फळीला मजबूती मिळणार आहे. २५ वर्षांच्या डेव्हिडचे वडील रॉड हेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते. त्यांनी १९९७च्या वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत सिंगापूर संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. डेव्हिड सिंगापूरचा नागरिक आहे, परंतु त्याचे कुटुंबीय ऑस्ट्रेलियात पुन्हा राहायला गेले अन् डेव्हिड तिथेच लहानाचा मोठा झाला.

Web Title: IPL 2022 Mega Auction Mumbai Indians finds replacement for Hardik Pandya as tall all rounder Tim David joins as Finisher in Owner Neeta Ambani Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.