IPL 2022 Mega Auction बंगळुरूमध्ये १२ आणि १३ फेब्रुवारीला पार पडलं. दहा संघांनी मिळून एकूण २०४ खेळाडूंवर बोली लावत त्यांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं. या मेगा लिलावाआधी प्रत्येक संघाला केवळ तीन भारतीय खेळाडू संघात ठेवणं शक्य होतं. त्यामुळे Mumbai Indiansने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव या तिघांना संघात कायम राखलं. इशान किशनला त्यांनी सर्वाधिक किंमत देत संघात परत आणलं. पण Hardik Pandya मात्र संघातून बाहेर गेला आणि त्याला गुजरात संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. हार्दिकला मुंबईने का करारमुक्त केलं, असा सवाल अनेक चाहत्यांना पडला होता. त्यावर अखेर मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी मौन सोडलं.
"आम्ही जेव्हा रिटेन्शनच्या खेळाडूंवर विचार करत होतो त्यावेळी रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या दोघांना संघात कायम करण्याचा निर्णय पटकन झाला. पण तिसऱ्या नावासाठी खूपच विचार करावा लागला. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि इशान किशन अशा तीन खेळाडूंमध्ये एकाची निवड करणं हे फारच कठीण होतं. मला रात्रभर झोप लागली नाही. अखेर आम्ही सूर्यकुमारला संघात घेतलं. हार्दिक आता गुजरात संघाचा कर्णधार झालाय. त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! पण इशान किशनला संघात परत घेता आलं याचा आम्हाला आनंद आहे", अशी भावना आकाश अंबानींनी बोलून दाखवली. पाहा व्हिडीओ-
"इशान किशनला आम्ही संघातून करारमुक्त केलं पण ऑक्शनमध्ये त्याला घेणार हे आधीच ठरवलं होतं. जोफ्रा आर्चरसाठीही आम्ही आधीच विचार करून ठेवला होता. या वेळी जरी तो खेळणार नसला, तरी जोफ्रा व जसप्रीत बुमराह ही जोडी पुढच्या IPL साठी सज्ज असेल. मला लिलावाआधी कोणी सांगितलं असतं की तुम्ही इशान किशन आणि जोफ्रा आर्चर दोघांना संघात विकत घेऊ शकाल तर मला विश्वास बसला नसता. पण महेला जयवर्धने यांनी नीट आखणी केली आणि संघात योग्य तो खेळाडू कसा येईल, यासाठी प्रयत्न केले. टीम डेव्हिडला खरेदी करणं चांगलंच ठरेल. तो पोलार्ड बरोबर सहा नंबरला फलंदाजी करणारा साथीदार असेल. कारण आम्ही कायम संघासाठी पॉवर हिटर निवडले आहेत", असंही आकाश अंबानी यांनी सांगितलं.
Web Title: IPL 2022 Mega Auction Mumbai Indians owner Akash Ambani had sleepless nights when Hardik Pandya was released from Squad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.