IPL 2022 Mega Auction मध्ये आधी Mumbai Indians कडून खेळलेला एक स्टार खेळाडू गुजरातच्या संघाने स्वस्तात खरेदी केला. IPL 2020 च्या हंगामात शिखर धवन तुफान फॉर्मात होता. एकाच हंगामात सलग दोन सामन्यात शतक ठोकणाऱ्या शिखर धवनला रोखण्याची कामगिरी फक्त एकाच गोलंदाजाला शक्य झाली होती. रोहित शर्माने अंतिम सामन्यासाठी एका खेळाडूला संघात घेतलं होतं आणि त्याने फॉर्मात असलेल्या शिखर धवनला क्लीन बोल्ड केले होते. मुंबईच्या IPL 2020 च्या विजेत्या संघातील महत्त्वाचा ठरलेला अनुभवी फिरकीपटू जयंत यादव याला गुजरात टायटन्स संघाने अवघ्या १ कोटी ७० लाखांच्या बोलीवर संघात दाखल करून घेतलं.
IPL 2020 च्या हंगामात शिखर धवन तुफान फॉर्मात होता. एकाच हंगामात सलग दोन सामन्यात शतक ठोकण्याची किमया कोणत्याही खेळाडूला जमली नव्हती. पण शिखर धवनने सलग दोन सामन्यात तुफान फटकेबाजी करत दोन शतकं झळकावली होती. त्या हंगामात मुंबई विरूद्ध दिल्ली असा अंतिम सामना रंगला. त्यावेळी अचानक शेवटच्या सामन्यासाठी अचानक रोहित शर्माने चलाख खेळी करत जयंत यादवला संघात स्थान दिलं होतं. आणि रोहितचा तो डाव यशस्वीही झाला होता. डावाच्या चौथ्या आणि जयंत यादवच्या पहिल्याच षटकात त्याने तुफान फॉर्मात असलेल्या शिखर धवनला क्लीन बोल्ड केले होते. त्यामुळे मुंबईपुढे दिल्लीला केवळ १५६ धावांचेच आव्हान ठेवता आले होते.