IPL 2022 Mega Auction मध्ये यंदाच्या हंगामासाठी तब्बल २०४ खेळाडूंवर बोली लावण्यात आली. यंदाचा मेगा लिलाव विविध कारणास्तव चर्चेत राहिला. सर्वप्रथम लिलावादरम्यान ऑक्शनर ह्यू एडमीड्स यांच्याबाबत घडलेल्या विचित्र प्रसंग घडला. सुदैवाने ते ठणठणीत असून लिलावाच्या अखेरीस ते सुखरूप असल्याचं साऱ्यांनीच पाहिलं. मात्र लिलावात सर्वाधिक चर्चा झाली ती खेळाडूंवर बोली लावणाऱ्या युवा सौंदर्यवतींची... मेगा लिलावादरम्यान SRH कडून संघमालक काव्या मारन (Kavya Maran) तर KKR कडून संघमालक शाहरूख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आणि सहसंघमालक जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहता (Janhvi Mehta) यांच्यावर तरूणाईची नजर खिळली होती. मात्र ऑक्शन संपल्यानंतर आता आणखी एक तरूणी चर्चेत आल्याचं दिसतंय. ती तरूणी म्हणजे बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) याची पत्नी उम्मे अहमद शिशीर (Umme Ahmed Shishir). शिशीर नेमकी कोणत्या कारणामुळे चर्चेत आली ते जाणून घेऊया.
IPL 2022 साठी झालेल्या मेगा लिलावात शाकीब अल हसनची मूळ किंमत २ कोटी ठरवण्यात आली होती. पण दोन्ही फेऱ्यांमध्ये शाकीबला विकत घेण्यात कोणीही रस दाखवला नाही. त्यामुळे तो शेवटपर्यंत UNSOLD राहिला. शाकीबला कोणी वाली न मिळाल्याने सोशल मीडियावर उलट सुलट चर्चांना उधाण आले. या चर्चांना पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर आणि मॉडेल असलेल्या शाकीबच्या पत्नीनेने उत्तर दिले. फेसबुकवर एक छोटीशी पोस्ट लिहीत तिने आपली भूमिका मांडली.
'शाकीब अनसोल्ड राहिल्याबाबत चर्चा रंगवण्याआधी मी सगळ्यांना सांगू इच्छिते की लिलावाआधीच शाकीबशी काही संघांनी संपर्क साधला होता. IPL च्या संपूर्ण हंगामासाठी शाकीब उपलब्ध असेल का अशी त्याला विचारणादेखील करण्यात आली होती. पण श्रीलंका दौरा नियोजित असल्यामुळे त्याने तसं स्पष्ट सांगितलं. म्हणूनच शाकीबवर यंदा बोली लावली गेली नाही. पण असं असलं तरी त्यावर फार आकांडतांडव करण्याची गरज नाही. हा काही शेवट नाही. पुढच्या वर्षी शाकीबला पुन्हा संधी नक्की मिळेल', असं शिशीरने फेसबुक पोस्टमधून स्पष्ट केलं.
'शाकीबला संघांकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की जर आम्ही तुला संघात घ्यावं असं वाटत असेल तर तुला श्रीलंका दौऱ्यावर पाणी सोडावं लागेल. या गोष्टी पाहता, अजूनही तुम्हा चाहत्यांना असंच म्हणायचं आहे का की शाकीबचं करियर संपलं? कारण त्याने श्रीलंका दौरा सोडून IPL खेळलं असतं तर तुम्हीच त्याला देशद्रोही ठरवून मोकळे झाला नसतात का? पण तुमच्या साऱ्या अंदाजांच्या चर्चांमधली हवा काढून टाकल्याबद्दल माफ करा', असा टोमणाही शिशीरने टीकाकारांना लगावला.
Web Title: IPL 2022 Mega Auction studded with Beautiful hot girls but now new Mystery Girl Umme Shishir in gossips on Social Media FB post goes Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.