Virat Kohli, IPL 2022 Mega Auction: "तू काहीही करून लिलावात उतर, पुढचं आम्ही बघतो"; कोहलीने सांगितला एक खास किस्सा

नक्की कोणत्या संघाकडून विराटला आली होती 'ऑफर'.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 10:47 AM2022-02-08T10:47:19+5:302022-02-08T10:48:07+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Mega Auction Virat Kohli reveals he was approached a few times by ipl franchises in past | Virat Kohli, IPL 2022 Mega Auction: "तू काहीही करून लिलावात उतर, पुढचं आम्ही बघतो"; कोहलीने सांगितला एक खास किस्सा

Virat Kohli, IPL 2022 Mega Auction: "तू काहीही करून लिलावात उतर, पुढचं आम्ही बघतो"; कोहलीने सांगितला एक खास किस्सा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli, IPL 2022 Mega Auction: IPL 2021 चं विजेतेपद चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने जिंकलं. ही स्पर्धा सुरू होण्याआधी विराट कोहलीने RCB च्या कर्णधारपदाचा राजीनामा जाहीर केला होता. स्पर्धा संपल्यावर तो पद सोडणार असं त्याने आधीच सांगितलं होतं. त्यामुळे विराट यापुढेही RCBमध्येच राहणार की दुसऱ्या संघात जाणार, अशी चर्चा रंगली होती. त्याचं साऱ्यांनाच काही काळाने उत्तर मिळालं. विराटला RCBने रिटेन केलं आणि संघात कायम ठेवलं. नुकतीच विराटने RCBच्या वेबसाईटसाठी एक मुलाखत दिली. त्यात त्याला इतर संघांकडून कधी ऑफर आल्या नाहीत का, असं विचारण्यात आलं. त्यावर त्याने एक खास किस्सा सांगितला.

RCB च्या पॉडकास्ट सेशनमध्ये विराटने अनेक गोष्टींवर दिलखुलास मतं मांडली. त्यावेळी त्याला इतर संघांकडून येणाऱ्या ऑफरबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर तो म्हणाला की अनेक संघांनी मला ऑफर दिली होती. "अनेक वेळा मला काही संघांचे लोक येऊन भेटायचे किंवा संवाद साधायचे. ते मला समजवायचा प्रयत्न करायचे की तू काहीही करून लिलावात उतर मग पुढचं आम्ही बघतो. मी पण त्याबद्दल थोडा विचार केला होता. पण नंतर तो विषय सोडून दिला. कारण जेव्हा एखादा खेळाडू काही वर्षांसाठी एका संघाकडून खेळतो तेव्हा त्याची ओळख तयार होते आणि तो जगातून निघून गेल्यावर तीच ओळख कायम राहते. जगात असे अनेक महान खेळाडू आहेत ज्यांनी ट्रॉफी जिंकल्या आहेत पण त्यांची ओळख मात्र तीच असते जी आधीपासून होती. जर तुम्ही चांगले असाल तर लोक तुमच्यावर प्रेम करतील. तुम्ही जर वाईट असाल तर लोकं तुम्हाला टाळतील. यालाच जीवन म्हणतात", असं अतिशय मुद्देसूद विराटने उत्तर दिलं.

दरम्यान RCB ने IPL स्पर्धा सुरू झाल्यापासून कधीही विजेतेपद मिळवलेले नाही. IPL 2016 च्या हंगामात ते कोहलीच्या नेतृत्वाखाली फायनलपर्यंत पोहोचले होते, पण त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं. कोहलीने मात्र IPL चांगलंच गाजवलं. त्याच्या नावावर IPL मध्ये २०७ सामन्यांमध्ये ३७ च्या सरासरीने ६ हजार २८३ धावा आहेत. कोहलीने स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत ५ दमदार शतकं आणि ४२ अर्धशतकं झळकावली आहेत.

Web Title: IPL 2022 Mega Auction Virat Kohli reveals he was approached a few times by ipl franchises in past

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.