No Ball Controversy IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामन्यात झालेला No Ball वाद अजूनही मिटण्याच्या मार्गावर नाही. त्या सामन्यातील अखेरच्या षटकात रंगलेल्या नाट्याची अजूनही चर्चा सुरू आहे. DCचा कर्णधा रिषभ पंत, शार्दूल ठाकूर आणि सहाय्यक प्रशिक्षक प्रविण अमरे यांच्यावर BCCIने कारवाईचा बडगा उगारला. त्या सामन्यात डग आऊटमध्ये नसलेल्या DC प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी हॉटेल रूममध्ये आदळआपट केली. आता या सर्व घडमोडीत मुंबई इंडियन्सचे ( Mumbai Indians) मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने ( Mahela Jayawardena) याने थेट ICC कडे महत्त्वाची विनंती केली आहे.
आयसीसी हॉल ऑफ फेम माहेला जयवर्धनेने बुधवारी आयसीसीला एक मुलाखत दिली. त्यात त्याने No Ball वादावर परखड मत मांडले. मागील आठवड्यात दिल्ली कॅपिटल्स व राजस्थान रॉयल्स यांच्यातल्या सामन्यात झालेल्या वादानंतर आयसीसीने अशा प्रकारचे वाद आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाळण्यासाठी योग्य ती पाऊलं उचलायला हवी, अशी विनंती जयवर्धनेने केली. DC vs RR सामन्यात फुलटॉस चेंडू हा कंबरेच्या वरच होता आणि मैदानावरील अम्पायरला तो दिसला नाही, असेही तो म्हणाला.
त्या सामन्यात अम्पायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याला १०० टक्के मॅच फी दंड म्हणून भरावी लागणार आहे. म्हणजेच त्याला १.१५ कोटींचा दंड भरावा लागणार आहे. पंतने कलम २.७मधील दुसऱ्या स्थराच्या नियमाचा भंग केला आणि त्याने त्याची चूक मान्य केली. शार्दूल ठाकूरला त्याच्या मॅच फीची ५० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. सहाय्यक प्रशिक्षक अमरे यांना १०० टक्के मॅच फी व एका सामन्याच्या बंदीची शिक्षा सुनावली गेली आहे.
आयसीसच्या नियम २१.५ अंतर्गत तिसऱ्या अम्पायरला केवळ गोलंदाजाच्या फ्रंट फूट नो बॉल चेक करता येतो. त्यात जर फुलटॉस चेंडू कंबरेच्या वर असल्यास तिसऱ्या अम्पायरची भूमिका काय असेल हे नमूद केलेले नाही.
त्यावर जयवर्धने म्हणाला, भविष्यात याचाही विचार व्हायला हवा. तिसऱ्या अम्पायरकडे अशा प्रकारच्या निर्णयाचा पर्याय असता तर चांगले झाले असते. DC vs RR सामन्यातील तो प्रकार पाहून निराश झालो. सामना थांबवावा लागला होता, सहाय्यक प्रशिक्षक मैदानावर धावले, परंतु प्रामाणिकपणे सांगायचे तर, अखेरच्या षटकातील त्या निर्णयामुळे तीव्र भावना व्यक्त झाल्या. दिल्लीच्या फलंदाजाने षटकार खेचले होते आणि मैदानावरील अम्पायरचा तो निर्णय चुकीचा असल्याची शक्यता दिसत होती. पण, तुम्ही या निर्णयासाठी तिसऱ्या अम्पायरकडे जाऊ शकत नाही, हे नियम सांगतो.
Web Title: IPL 2022: MI coach Jayawardena urges ICC to utilize TV umpires better after no-ball controversy in DC v RR match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.