Join us  

MS Dhoni on Ravindra Jadeja : महेंद्रसिंग धोनीचे अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाबाबत मोठे विधान; पाहा हा Video 

MS Dhoni on Ravindra Jadeja : चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल इतिहासात दुसऱ्यांदा प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 11:46 PM

Open in App

MS Dhoni on Ravindra Jadeja : चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल इतिहासात दुसऱ्यांदा प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले. २०२०नंतर चेन्नईला प्रथमच प्ले ऑफ आधी गाशा गुंडाळावा लागला आहे. मुंबई इंडियन्सने गुरुवारी ५ विकेट्स राखून त्यांच्यावर विजय मिळवला. CSK च्या ताफ्यात सध्या रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) सोबतच्या वादाचा अध्याय सुरू आहे. आयपीएल २०२२ ला सुरूवात होण्याआधी जडेजाला कर्णधार बनवले गेले, पण ८ सामन्यांत २ विजय मिळवल्यानंतर त्याला हटवले गेले. त्यानंतर दुखापतीमुळे तो बाहेर बसला आणि आता तर थेट आयपीएल २०२२मधूनच माघार घेतली. त्यामुळे  CSK vs Ravindra Jadeja ही चर्चा आणखी वाढली. यात आता महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) मोठे विधान केले. 

ऋतुराज गायकवाड ( ७), डेवॉन ( ०) , रॉबिन उथप्पा ( १)  व मोईन अली ( ०), अंबाती रायुडू ( १०), शिवम दुबे ( १०)  व ड्वेन ब्राव्हो ( १२) यांना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी जाळ्यात अडकवले. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni)ने ३३ चेंडूंत नाबाद ३६ धावा केल्या. चेन्नईचा डाव १६ षटकांत ९७ धावांवर गडगडला. डॅनिएल स‌‌ॅम्सने १६ धावांत ३, रिले मेरेडिथने २७ धावांत २ व कुमार कार्तिकेयने २२ धावांत २ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह व रमणदीप सिंग यांच्या वाट्याला प्रत्येकी एक विकेट आली.

प्रत्युत्तरात मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा ( १८) व इशान किशन ( ६) हेही झटपट माघारी परतले. डॅनिएल स‌ॅम्स ( १) व त्रिस्ताना स्तुब्स ( ०) हेही बाद झाले. मुकेश चौधरीने ४ षटकांत २३ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  सिमरजीत सिंगने २२ धावांत १ विकेट घेतली. पण, तिलक वर्मा व हृतिक शोकिन  (१८) यांनी  ४८ धावांची भागीदारी केली. मुंबईने हा सामना ५ विकेट्स राखून जिंकला.  टीम डेव्हिडने  (१६*) दोन खणखणीत सिक्स मारले आणि विजय पक्का केला. तिलक ३४ धावांवर नाबाद राहिला. मुंबईने १४.५ षटकांत ५ बाद १०३ धावा केल्या.

नाणेफेकीच्या वेळेस धोनी जडेजाबद्दल काय म्हणाला?रवींद्र जडेजासारखा खेळाड पुन्हा होणे नाही. तो अशा खेळाडूंपैकी एक आहे जो आम्हाला संघाच्या कॉम्बिनेशनमध्ये प्रयोग करण्यात मदत करतो. त्याला रिप्लेस करणे अवघड आहे. त्याच्यासारखं क्षेत्ररक्षण कुणी करू शकतं असं मला वाटत नाही. याबाबतीत त्याला तोड नाही,''असे धोनी म्हणाला.  

टॅग्स :आयपीएल २०२२महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सरवींद्र जडेजामुंबई इंडियन्स
Open in App