Pollard vs Bravo IPL 2022 MI vs CSK Live Updates : किरॉन पोलार्डने चौकार खेचला अन् त्यानंतर ड्वेन ब्राव्होने त्याच्या दिशेने चेंडू फेकून मारला, मग पुढे काय झालं ते पाहा...

आयपीएल २०२२मध्ये या MI व CSK या दोन्ही संघांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आलेय... पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला सहापैकी एकही सामना जिंकता आलेला नाही, तर चेन्नईने सहापैकी एकच सामना जिंकलेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 08:51 PM2022-04-21T20:51:47+5:302022-04-21T22:40:17+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 MI vs CSK Live Updates : Dwayne Bravo throw ball toward Pollard and A kiss from Kieron Pollard in the head of Dj bravo | Pollard vs Bravo IPL 2022 MI vs CSK Live Updates : किरॉन पोलार्डने चौकार खेचला अन् त्यानंतर ड्वेन ब्राव्होने त्याच्या दिशेने चेंडू फेकून मारला, मग पुढे काय झालं ते पाहा...

Pollard vs Bravo IPL 2022 MI vs CSK Live Updates : किरॉन पोलार्डने चौकार खेचला अन् त्यानंतर ड्वेन ब्राव्होने त्याच्या दिशेने चेंडू फेकून मारला, मग पुढे काय झालं ते पाहा...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Updates : मुंबई इंडियन्सचा अपयशाचा पाढा आजच्या सामन्यातही कायम दिसेल असेच चित्र आहेत. रोहित शर्मा व इशान किशन पहिल्याच षटकात भोपळ्यावर माघारी परतल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या मुकेश चौधरीने फास आवळला. चेन्नईच्या खेळाडूंनी झेल सोडून मुंबईला आधार दिला खरा, परंतु त्याचा फायदा उचलण्यात ते अपयशी ठरले. अशात या सामन्यात ड्वेन ब्राव्हो विरुद्ध किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard vs Dwayne Bravo ) हा सामना पाहायला मिळाला.

मुंबई व चेन्नई आतापर्यंत ३२  वेळा समोरासमोर आलेत, परंतु त्यात सर्वाधिक १९ विजय हे मुंबईच्या नावावर आहेत. आजच्या सामन्यातून रिली मेरेडिथ व दिल्लीचा २१ वर्षीय फिरकीपटू हृतिक शोकीन यांनी आज मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले आहे. डॅनिएल सॅम्सही संघात परतला आहे. चेन्नईच्या संघात दोन बदल पाहायला मिळत आहेत. ड्वेन प्रेटोरियस आणि मिचेल सँटनर यांना ख्रिस जॉर्डन व मोईन अली यांच्याजागी स्थान दिले आहे.  

मुकेशने पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहितला चकवले. इनस्वींगर चेंडू खेळण्यात रोहित फसला अन् मिचेल सॅटनरच्या हाती सोपा झेल देऊन माघारी परतला. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक १४वेळा भोपळ्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम रोहितच्या नावावर नोंदवला गेला. त्याने पियुष चावला, हरभजन सिंग, मनदीप सिंग यांचा प्रत्येकी १३वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम मोडला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर इशान किशनचा ( ०) त्रिफळा उडवत मुकेशने मोठे यश मिळवून दिले. तिसऱ्या षटकात मुकेशने डेवॉल्ड ब्रेव्हिसला ( ४) माघारी जाण्यास भाग पाडले आणि मुंबईने २३ धावांवर तीन फलंदाज गमावले. सूर्यकुमार यादव डाव सावरेल असे चित्र होते आणि तोही चांगली फटकेबाजी करत होता, परंतु २१ चेंडूंत ३२ धावा करणाऱ्या सूर्यकुमारला CSKचा फिरकीपटू मिचेल सँटनरने बाद केले.  

रवींद्र जडेजाकडून दोन सोपे झेल सुटले, महेंद्रसिंग धोनीकडून स्टम्पिंग चुकली अन् ड्वेन ब्राव्होनेही एक जीवदान दिले. अन्यथा मुंबईची अवस्था आणखी वाईट झाली असती. पदार्पणवीर हृतिक शोकिनने काही सुरेख फटके मारून चेन्नईच्या गोलंदाजांना हैराण केले, परंतु १४व्या षटकात CSKने हुकमी गोलंदाज ड्वेन ब्राव्होला आणले. ब्राव्होने अनुभवाच्या जोरावर हृतिकला ( २५) बाद केले. मुंबईचा निम्मा संघ ८५ धावांवर तंबूत परतला होता. १४व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर किरॉन पोलार्डने चौकार मारला. त्यानंतर पुढील चेंडू पोलार्डने बचावात्मक खेळला. पण, ब्राव्होने तो चेंडू पोलार्डच्या दिशेने फेकला. त्यानंतर पोलार्डने शॅडो प्रॅक्टीस केली व पुढे येऊन ब्राव्होच्या डोक्याचे चुंबन घेतले. अर्थात हे सर्व मस्करीत सुरू होते. पोलार्ड व ब्राव्हो चांगले मित्र आहेत.


Web Title: IPL 2022 MI vs CSK Live Updates : Dwayne Bravo throw ball toward Pollard and A kiss from Kieron Pollard in the head of Dj bravo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.