IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२त आज चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स हे दोन तगडे संघ एकमेकांना भिडणार आहेत. आयपीएलमधील El Clasico लढत म्हणून ओळखला जाणारा CSK vs MI हा सामना दोघांसाठीही महत्त्वाचा आहे. आयपीएल २०२२मध्ये या दोन्ही संघांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आलेय... पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला सहापैकी एकही सामना जिंकता आलेला नाही, तर चेन्नईने सहापैकी एकच सामना जिंकलेला आहे. त्यामुळे एकीकडे अन्य संघ प्ले ऑफमधील जागा पक्की करण्यासाठी लढत असताना मुंबई-चेन्नई आतापासूनच आव्हान टिकवण्यासाठी संघर्ष करत आहेत.
हार्दिक पांड्या, ट्रेंट बोल्ट, कृणाल पांड्या, राहुल चहर, क्विंटन डी कॉक यांना सक्षम पर्याय शोधण्यात मुंबईचा संघ सपशेल अपयशी ठरलाय. इशान किशनला अद्याप साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्माही झगडतोय. जसप्रीत बुमराहला डेथ ओव्हरमध्ये साथ देणारा गोलंदाज MI कडे नाही. त्यामुळे CSKविरुद्ध मुंबई कोणती रणनीती आखतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. आजच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) पदार्पण करेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. २०२१ पासून अर्जुन मुंबई संघाचा भाग आहे. गेल्या वर्षी त्याला संघात खेळायला मिळाले नाही. यंदाच्या पर्वातही ३० लाखांत मुंबई इंडियन्सने त्याला पुन्हा ताफ्यात घेतले, परंतु अद्याप संधी दिलेली नाही. त्याला अद्यापही प्रतीक्षा पाहावी लागले.
जसप्रीत बुमराह आज २०० वा ट्वेंटी-२० सामना खेळणार आहे आणि त्याने २४२ विकेट्स घेतल्या आहेत. आजच्या सामन्यातून रिली मेरेडिथ व दिल्लीचा २१ वर्षीय फिरकीपटू हृतिक शोकीन यांनी आज मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले आहे. डॅनिएल सॅम्सही संघात परतला आहे. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. चेन्नईच्या संघात दोन बदल पाहायला मिळत आहेत. ड्वेन प्रेटोरियस आणि मिचेल सँटनर यांना ख्रिस जॉर्डन व मोईन अली यांच्याजागी स्थान दिले आहे.
Web Title: IPL 2022 MI vs CSK Live Updates : Hrithik Shokeen and Riley Meredith making his debut for Mumbai Indians, no place for Arjun Tendulkar, CSK have won the toss and they've decided to bowl first.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.