IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Updates : महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सच्या नेतृत्वाची जबाबदारी रवींद्र जडेजाच्या खांद्यावर सोपवली आहे. पण, संघाला गरज असताना धोनी पुढे येऊन त्याच्या अनुभवाचा वापर करताना दिसतोय. आयपीएल २०२२च्या आतापर्यंत झालेल्या CSKच्या सामन्यात याची प्रचिती आली आणि त्याचा रिझल्टही चांगला मिळाला. आजही मुंबई इंडियन्सविरुद्ध चतुर धोनीने खास फिल्डिंग सेट केली आणि किरॉन पोलार्डची विकेट मिळवली. त्याच्या या चतुराईचे सारेच कौतुक करत आहेत.
मुकेश चौधरीने पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा व इशान किशन यांना भोपळ्यावर माघारी पाठवले. त्यानंतर डेवॉल्ड ब्रेव्हिसला ( ४) अपयश आले. सूर्यकुमार यादव ( ३२), पदार्पणवीर हृतिक शोकिन ( २५), जयदेव उनाडकट ( १९) व किरॉन पोलार्ड ( १४) यांनी योगदान दिले. १९ वर्षीय तिलक वर्माने अखेरपर्यंत खिंड लढवताना ४३ चेंडूंत नाबाद ५१ धावा केल्या आणि मुंबईला ७ बाद १५५ धावांपर्यंत पोहोचवले. मुकेश चौधरीने १९ धावांत ३, ड्वेन ब्राव्होने ३६ धावांत २ विकेट्स घेतल्या. मिचेल सँटनर व महिष थिक्साना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मुंबई इंडियन्सविरुद्ध ब्राव्होने सर्वाधिक ३३ विकेट्स घेतल्या. उमेश यादवे पंजाब किंग्सविरुद्ध ही कामगिरी केली आहे.
थिक्सानाने घेतलेली विकेट महत्त्वाची ठरली. त्याने पोलार्डला माघारी पाठवले. पण, यामागे महेंद्रसिंग धोनीचे डोके होते. १७व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर धोनीने खास फिल्डिंग सेट केली. त्याने शिवम दुबेला लाँग ऑनला उभे केले आणि त्यावर पोलार्ड फसला. दुबेने सीमारेषेवर सोपा झेल घेताच, धोनीने सेलिब्रेशन केले. १२ वर्षांपूर्वीही धोनीने अशीच रणनीती आखून पोलार्डची विकेट मिळवली होती.
Web Title: IPL 2022 MI vs CSK Live Updates : MS Dhoni placed a fielder for Kieron Pollard straight once again and he gets out on the very next ball, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.