IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील ज्या सामन्याची प्रतीक्षा सर्वांना होती तो मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स ( MI vs CSK) सामना होत आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार रवींद्र जडेजा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्याच षटकात मुकेश चौधरीने ( Mukesh Choudhary) पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सला दोन धक्के दिले. षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर मुकेशने MIचा कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma) आपल्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) CSK गोलंदाजाच्या कानात येऊन काहीतरी बोलला अन् पाचव्या चेंडूवर करिष्मा झाला.
आयपीएल २०२२मध्ये या MI व CSK या दोन्ही संघांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आलेय... पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला सहापैकी एकही सामना जिंकता आलेला नाही, तर चेन्नईने सहापैकी एकच सामना जिंकलेला आहे. मुंबई व चेन्नई आतापर्यंत ३२ वेळा समोरासमोर आलेत, परंतु त्यात सर्वाधिक १९ विजय हे मुंबईच्या नावावर आहेत. आजच्या सामन्यातून रिली मेरेडिथ व दिल्लीचा २१ वर्षीय फिरकीपटू हृतिक शोकीन यांनी आज मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले आहे. डॅनिएल सॅम्सही संघात परतला आहे. चेन्नईच्या संघात दोन बदल पाहायला मिळत आहेत. ड्वेन प्रेटोरियस आणि मिचेल सँटनर यांना ख्रिस जॉर्डन व मोईन अली यांच्याजागी स्थान दिले आहे.
मुकेशने पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहितला चकवले. इनस्वींगर चेंडू खेळण्यात रोहित फसला अन् मिचेल सॅटनरच्या हाती सोपा झेल देऊन माघारी परतला. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक १४वेळा भोपळ्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम रोहितच्या नावावर नोंदवला गेला. त्याने पियुष चावला, हरभजन सिंग, मनदीप सिंग यांचा प्रत्येकी १३वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम मोडला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर इशान किशनचा ( ०) त्रिफळा उडवत मुकेशने मोठे यश मिळवून दिले. तिसऱ्या षटकात मुकेशने डेवॉल्ड ब्रेव्हिसला ( ४) माघारी जाण्यास भाग पाडले आणि मुंबईने २३ धावांवर तीन फलंदाज गमावले.
Web Title: IPL 2022 MI vs CSK Live Updates : Mukesh Choudhary got Rohit Sharma for duck and Ishan kishan for golden duck in the first over, Rohit Sharma now has most ducks in IPL history, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.