IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitals Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये आज अत्यंत महत्त्वाचा सामना होत आहे. पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आले असले तरी त्यांच्या विजयासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) प्रार्थना करत आहेत. दुसरीकडे प्ले ऑफमध्ये एन्ट्री घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सही विजयाच्या निर्धाराने मैदानावर उतरले आहेत. मुंबई इंडियन्सने ( MI) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पण, आजच्या सामन्यात पाऊस खोडा घालू शकतो... नाणेफेक करून पॅव्हेलियनच्या दिशेने दोन्ही कर्णधार जात असताना पावसाने एन्ट्री मारली होती आणि खेळपट्टी झाकावी लागली होती. पण, ५-१० मिनिटांनंतर पाऊस थांबला आणि सामना वेळेत सुरू झाला. मात्र, जर पुन्हा पाऊस आला आणि सामना झाला नाही तर काय?
शुक्रवारी RCB ने गुजरात टायटन्सला पराभूत करून स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखले. आरसीबीच्या विजयामुळे मात्र पंजाब किंग्स व सनरायझर्स हैदराबाद यांचे आव्हान संपुष्टात आले. मुंबईने आज दिल्लीला हरवल्यास RCBचा प्ले ऑफचा मार्ग निश्चित होईल. पण, जर दिल्ली जिंकल्यास समान गुण असूनही उत्तम नेट रन रेटच्या जोरावर रिषभ पंतचा संघ प्ले ऑफमध्ये जाईल. RCB चा नेट रन रेट हा -0.253 असा आहे, तर दिल्लीचा 0.255 आहे. त्यामुळे दिल्लीचा पराभव हा RCB साठी महत्त्वाचा आहे. ( पाहा IPL 2022 - MI vs DC सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )
दिल्ली कॅपिटल्स - पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिषभ पंत, सर्फराज खान, रोव्हमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिच नॉर्खिया, खलिल अहमद ( Delhi Capitals Playing XI: 1 David Warner, 2 Prithvi Shaw, 3 Mitchell Marsh, 4 Rishabh Pant (capt & wk), 5 Sarfaraz Khan, 6 Rovman Powell, 7 Axar Patel, 8 Shardul Thakur, 9 Kuldeep Yadav, 10 Anrich Nortje, 11 Khaleel Ahmed)
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, डेवॉल्ड ब्रेव्हिस, रमणदीप सिंग, टीम डेव्हिड, डॅनिएल सॅम्स, हृतिक शोकिन, जसप्रीत बुमराह, मयांक मार्कंडे, रिली मेरेडिथ ( Mumbai Indians Playing XI: 1 Rohit Sharma (capt), 2 Ishan Kishan (wk), 3 Tilak Varma, 4 Dewald Brevis, 5 Ramandeep Singh, 6 Tim David, 7 Daniel Sams, 8 Hrithik Shokeen, 9 Jasprit Bumrah, 10 Mayank Markande, 11 Riley Meredith)
पावसामुळे सामना न झाल्यास?आता सामना सुरू झाला आहे... त्यामुळे नेमकी किती षटकं झाल्यानंतर पाऊस येतो आणि त्यानंतर परिस्थिती पाहून कमी षटकांचा समाना होऊ शकतो.. पण, जर सामना झालाच नाही, तर RCBला मोठा फायदा होईल. ते प्ले ऑफसाठी पात्र ठरतील. कारण या लढतीसाठी राखीव दिवस ठेवलेला नाही.