IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitals Live Updates : प्ले ऑफमधील स्थान पक्के करण्यासाठी महत्त्वाच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सचा संघ दडपणाखाली दिसला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना DC ला पटापट ४ धक्के दिले. रोव्हमन पॉवेल व रिषभ पंत यांनी ७५ धावांची भागीदारी करून दिल्लीला ट्रॅकवर आणले. जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आज स्टार ठरला. त्याने दिल्लीच्या तीन प्रमुख फलंदाजांना माघारी पाठवले. जसप्रीत बुमराहने आजच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली.
डेव्हिड वॉर्नर ( ५) व मिचेल मार्श ( ०) हे हुकमी एक्के २२ धावांवर माघारी परतले. डॅनिएल सॅम्स व जसप्रीत बुमराह यांनी या विकेट घेतल्या. आजारपणातून सावरलेला पृथ्वी शॉ आक्रमक खेळ करताना दिसला. सहाव्या षटकात बुमराहने DC ला आणखी मोठा धक्का दिला. दिल्लीचा तिसरा फलंदाज ३१ धावांवर माघारी परतला. पृथ्वीने २४ धावा केल्या. सर्फराज खानने काही दमदार फटके खेचले खरे, परंतु मयांक मार्कंडेच्या फिरकीवर तो १० धावांवर बाद झाला. दिल्लीला ५० धावांवर चौथा धक्का बसला. ( पाहा IPL 2022 - MI vs DC सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )
शोकिन व मयांक या फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी करताना दिल्लीवर सातत्याने दडपण निर्माण करण्यात यश मिळवले होते. पण, खेळाडूंच्या काही गचाळ क्षेत्ररक्षणामुळे रोहित निराश दिसला. रोव्हमन पॉवेलने १२ व्या षटकात शोकिनला ६, ६, ४ असे फटके मारून २० धावा कुटल्या. पुढील षटकात मयांकला त्याने १३ धावा चोपल्या, यातील ४ धावा या Bye म्हणून मिळाल्या. मयांकने ४ षटकांत २६ धावांत १ विकेट घेतली, तर शोकिनने ४ षटकांत ३४ धावा दिल्या. त्याच्या चौथ्या षटकात २० धावा आल्या. रोव्हमन व रिषभ यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून दिल्लीच्या डावाला आकार दिला.
रोव्हमनच्या फटकेबाजीनंतर रिषभही आता त्या मूडमध्ये येताना दिसला. रमणदीप सिंगच्या षटकात त्याने खणखणीत षटकार खेचला, परंतु Wide जाणाऱ्या चेंडूला छेडणे त्याला महागात पडले. रिषभ ३९ धावांवर बाद झाल्याने रोव्हमनसोबत त्याची ४४ चेंडूंत ७५ धावांची भागीदारीही संपुष्टात आली. त्यानंतर पुन्हा दिल्लीच्या धावांचा वेग मंदावला. १९व्या षटकात बुमराने भन्नाट यॉर्कर टाकला आणि रोव्हमनचा त्रिफळा उडवला. रोव्हमनने ३४ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारासह ४३ धावा केल्या. बुमराहने ४ षटकांत २५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीने ७ बाद १५९ धावा केल्या. अक्षरने नाबाद १९ धावा केल्या.
मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत त्याने १४८ विकेट्ससह दुसरे स्थान पटकावले. लसिथ मलिंगा (१९५) अव्वल स्थानी आहे, तर हरभजन सिंग ( १४७) तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या सलग ७ पर्वांत १५ + विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. लसिथ मलिंगाने अशी कामगिरी केली आहे.
जसप्रीत बुमराहची २०१६ पासून आयपीएलमधील कामगिरी
2016 - 15 wickets (7.81 eco)
2017 - 20 wickets (7.43 eco)
2018 - 17 wickets (6.89 eco)
2019 - 19 wickets (6.63 eco)
2020 - 27 wickets (6.73 eco)
2021 - 21 wickets (7.45 eco)
2022 - 15 wickets (7.18 eco)
Web Title: IPL 2022 MI vs DC Live Updates : Jasprit Bumrah becomes the first Indian bowler to take 15 wickets for the 7th consecutive year in IPL history, Mumbai Indians need 160 to help RCB qualify for Playoffs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.