IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitals Live Updates : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवरील सामना चुरशीचा झाला. DC संघ दडपणाखाली खेळला. जसप्रीत बुमराह, इशान किशन, डेवॉल्ड ब्रेव्हिस आणि टीम डेव्हिड हे मुंबई इंडियन्सचे मॅच विनर खेळाडू ठरले. DC चा कर्णधार रिषभ पंतने ( Rishabh Pant) आज चूका केल्या. ब्रेव्हिस व डेव्हिड ( ०) यांना त्याने दिलेले जीवदान दिल्लीला महागात पडले. मुंबईच्या विजयानंतर वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) नावाचा गजर झाला. DC च्या पराभवामुळे RCBचा प्ले ऑफचा मार्ग मोकळा झाला आणि आता एलिमिनेटर मध्ये त्यांच्यासमोर लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान असणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांकडूनही जबरदस्त प्रतिहल्ला झाला. रोहित १३ चेंडूंत २ धावांवर बाद झाला. डेवॉल्ड ब्रेव्हिस व इशान MIच्या डावाला आकार देत होते. इशान व ब्रेव्हिस यांनी ३७ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. १०व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर इशानने १८ धावा चोपल्या, तरीही रिषभने १२वे षटक त्याला दिले. रिषभचा हा विश्वास कुलदीपने सार्थ ठरवला आणि इशान ३५ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४८ धावांवर झेलबाद झाला. त्याच षटकात ब्रेव्हिस ( २५) झेल उडाला होता आणि रिषभ मेरा कॅच है म्हणत पुढे आला, परंतु त्याच्याकडून हा झेल सुटला. कुलदीपने ४ षटकांत ३३ धावांत १ विकेट घेतली.
जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आज स्टार ठरला. बुमराहने ४ षटकांत २५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. डेव्हिड वॉर्नर ( ५), मिचेल मार्श ( ०), पृथ्वी शॉ ( २४) आणि सर्फराज खान ( १०) हे फलंदाज माघारी परतल्याने दिल्लीच्या ४ बाद ५० धावा धाल्या होत्या. रोव्हमन पॉवेल ( ४३) व रिषभ पंत ( ३९) यांनी पाचव्या विकेटसाठी ७५ धावा जोडल्या. . दिल्लीने ७ बाद १५९ धावा केल्या. अक्षरने नाबाद १९ धावा केल्या. मयांक मार्कंडेने ४ षटकांत २६ धावांत १ विकेट घेतली, तर हृतिक शोकिनने ४ षटकांत ३४ धावा दिल्या. रमणदीप सिंगने २ षटकांत २९ धावांत २ विकेट्स घेतल्या. डॅनिएल सॅम्सला एक विकेट मिळाली.