IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitals Live Updates : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेला सामना चुरशीचा होतोय... दिल्लीने विजयासाठी ठेवलेल्या १६० धावांचा यशस्वी पाठलाग जेवढा MI ला गरजेचा नाही, तेवढा तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आहे... आज दिल्ली हरल्यास RCBचा प्ले ऑफचा मार्ग मोकळा होईल आणि त्यामुळे मुंबईला चिअर करण्यासाठी संपूर्ण RCBचा संघ टीव्ही समोर बसला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ दडपणाखाली खेळला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना पहिल्या १० षटकांत DC ला ४ धक्के दिले. रोव्हमन पॉवेल व रिषभ पंत यांनी ७५ धावांची भागीदारी करून दिल्लीला ट्रॅकवर आणले. जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आज स्टार ठरला. त्याने दिल्लीच्या तीन प्रमुख फलंदाजांना माघारी पाठवले. डेव्हिड वॉर्नर ( ५), मिचेल मार्श ( ०), पृथ्वी शॉ ( २४) आणि सर्फराज खान ( १०) हे फलंदाज माघारी परतल्याने दिल्लीच्या ४ बाद ५० धावा धाल्या होत्या. रोव्हमन पॉवेल व रिषभ पंत यांनी पाचव्या विकेटसाठी ७५ धावा जोडल्या. रिषभ ३९ धावांवर बाद झाला. रोव्हमनने ३४ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारासह ४३ धावा केल्या.
बुमराहने ४ षटकांत २५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. दिल्लीने ७ बाद १५९ धावा केल्या. अक्षरने नाबाद १९ धावा केल्या. मयांक मार्कंडेने ४ षटकांत २६ धावांत १ विकेट घेतली, तर हृतिक शोकिनने ४ षटकांत ३४ धावा दिल्या. रमणदीप सिंगने २ षटकांत २९ धावांत २ विकेट्स घेतल्या. डॅनिएल सॅम्सला एक विकेट मिळाली. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांकडूनही जबरदस्त प्रतिहल्ला झाला. त्यांनी टिच्चून मारा करताना पहिल्या ६ षटकांत केवळ २७ धावा दिल्या आणि रोहित शर्माची विकेटही मिळवली. रोहित १३ चेंडूंत २ धावा करून एनरिच नॉर्खियाच्या गोलंदाजीवर शार्दूल ठाकूरच्या हाती झेल देऊन बसला. आयपीएलच्या पर्वात एकही अर्धशतक न झळकावण्याची रोहितची यंदाची पहिलीच वेळ ठरली.
पाहा रोहित शर्माची विकेट...