Hardik Pandya IPL 2022 MI vs GT Live Updates : गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली, मुंबई इंडियन्सने विजयी संघात केला बदल

 रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाला आहे, तर नव्याने दाखल झालेला गुजरात टेबल टॉपर आहे. या सामन्याच्या निमित्ताने रोहित विरुद्ध हार्दिक पांड्या असा सामना पाहण्यासाठी सारे उत्सुक आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 07:10 PM2022-05-06T19:10:06+5:302022-05-06T19:10:26+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 MI vs GT Live Updates : Gujarat Titans have won the toss and they've decided to bowl first, Murugan Ashwin replaces Hrithik Shokeen.  | Hardik Pandya IPL 2022 MI vs GT Live Updates : गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली, मुंबई इंडियन्सने विजयी संघात केला बदल

Hardik Pandya IPL 2022 MI vs GT Live Updates : गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली, मुंबई इंडियन्सने विजयी संघात केला बदल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Mumbai Indians vs Gujarat Titans Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या पर्वातील आव्हान संपुष्टात आलेला मुंबई इंडियन्सचा संघ ( MI ) आज ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात टायटन्सचा  ( GT) सामना करणार आहे.  रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाला आहे, तर नव्याने दाखल झालेला गुजरात टेबल टॉपर आहे. या सामन्याच्या निमित्ताने रोहित विरुद्ध हार्दिक पांड्या असा सामना पाहण्यासाठी सारे उत्सुक आहेत. इतकी वर्ष MI कडून खेळणारा हार्दिक प्रथमच विरोधात खेळणार आहे. गुजरातने हार्दिकच्या नेतृत्वाखाली 10पैकी 8 सामने जिंकून प्ले ऑफमधील स्थान जवळपास पक्के केले आहे. ( पाहा IPL 2022 - MI vs GT सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड

मुंबईला आता पुढच्या आयपीएलच्या दृष्टीने आतापासूनच विचार करावा लागणार आहे आणि उर्वरित सामन्यांत त्यांना संघातील कॉम्बिनेशमध्ये प्रयोग करता येणार आहेत. मुंबई इंडियन्सला यंदाच्या पर्वात पांड्या बंधूंची उणिव प्रकर्षाने जाणवली आहे आणि हे सत्य लपून राहिलेले नाही. किरॉन पोलार्ड संघात आहे, परंतु त्याचा फॉर्म हार्दिकची उणिव भरून काढताना दिसत नाही. इशान किशन व रोहित शर्मा यांची निराशाजनक कामगिरी व गोलंदाजी विभागात सातत्याने येणारे अपयश, हे मुंबईच्या पराभवामागचे प्रमुख कारण आहे. पण, मागील सामन्यात मुंबईने सांघिक कामगिरी करून पहिला विजय मिळवला. आता त्यात सातत्य राखण्यात ते यशस्वी होतात का, याची उत्सुकता आहे.


हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मागील सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय गुजरातच्या अंगलट आला होता, ती चूक हार्दिकने आता सुधारली. हार्दिकने संघात मात्र कोणताच बदल केलेला नाही. मुंबईच्या संघात एक बदल झाला असून मुरुगन अश्विन आज हृतिक शोकिनच्या जागेवर खेळणार आहे. 

Web Title: IPL 2022 MI vs GT Live Updates : Gujarat Titans have won the toss and they've decided to bowl first, Murugan Ashwin replaces Hrithik Shokeen. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.