IPL 2022 MI vs LSG: शनिवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने दमदार विजय मिळवला. यात लखनौचा कर्णधार लोकेश राहुलने (KL Rahul) तुफान फटकेबाजी करत शतक ठोकले. पण, सामन्यानंतर केएल राहुलवर BCCIने दंदात्मक कारवाई केली आहे.
शनिवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL-2022) च्या 15 व्या मोसमात मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी राहुलला दंड ठोठावण्यात आला आहे. BCCI ने शनिवारी रात्री जारी केलेल्या निवेदनानुसार, 'शनिवारी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे.' आयपीएल आचारसंहितेअंतर्गत किमान ओव्हर-रेटशी संबंधित हे या संघाचे पहिले प्रकरण आहे, त्यामुळे कर्णधार लोकेश राहुलला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबईची सर्वात खराब कामगिरी
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईसाठी यंदाचा मोसम खूप वाईट गेला आहे. मुंबईने या मोसमात सलग 6 सामने गमावले आहे. आयपीएलच्या इतिहासात मुंबईची ही आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात केएल राहुलच्या नाबाद 103 धावांच्या शतकामुळे लखनौने 20 षटकांत 4 गडी गमावून 199 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई संघ 9 गडी गमावून 181 धावाच करू शकला. आयपीएल कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावणाऱ्या राहुलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
Web Title: IPL 2022 MI vs LSG: KL Rahul fined 12 lacs for slow over rate in MI vs LSG match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.