Kieron Pollard IPL 2022, MI vs LSG Live Updates : किरॉन पोलार्डने सामना फिरवला, Krunal Pandyaची विकेट घेत केले अतरंगी सेलिब्रेशन, Video 

IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : १०८३ दिवसांनी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर परतलेल्या मुंबई इंडियन्सचा जोश परतलेला पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 09:03 PM2022-04-24T21:03:44+5:302022-04-24T21:04:29+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 MI vs LSG Live Updates : Kieron Pollard gives a silent send off to Krunal Pandya, watch video of  Krunal Pandya Wicket | Kieron Pollard IPL 2022, MI vs LSG Live Updates : किरॉन पोलार्डने सामना फिरवला, Krunal Pandyaची विकेट घेत केले अतरंगी सेलिब्रेशन, Video 

Kieron Pollard IPL 2022, MI vs LSG Live Updates : किरॉन पोलार्डने सामना फिरवला, Krunal Pandyaची विकेट घेत केले अतरंगी सेलिब्रेशन, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : १०८३ दिवसांनी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर परतलेल्या मुंबई इंडियन्सचा जोश परतलेला पाहायला मिळाला. त्यात मुंबईचा स्टार किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) याने कर्णधार रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवला आणि लखनौ सुपर जायंट्सला दोन मोठे धक्के दिले. कृणाल पांड्याची ( Krunal Pandya) विकेट मिळवल्यानंतर पोलार्डने केलेले सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरले. 


कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉक व लोकश राहुल यांना फटकेबाजी केली. तिलक वर्माने चौथ्या षटकात क्विंटनचा झेल सोडला व तो षटकार गेला. पण, जसप्रीत बुमराहने पुढच्याच  चेंडूवर त्याची भरपाई केली आणि रोहित शर्माने सुरेख झेल टिपला. क्विंटन १० धावांवर बाद झाला. मुंबईच्या गोलंदाजांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये चांगला दबाव बनवला आणि LSG ला १ बाद ३२ धावाच करता आल्या. लोकेश राहुल संयमी खेळ करताना दिसला आणि तो विकेट टिकवून ठेवताना लखनौचा धावफलक हलता ठेवत होता. 

९व्या षटकाच्या दुसऱ्या षटकात लोकेश राहुलला रन आऊट करण्याची संधी रोहितकडून थोडक्यात हुकली. त्यानंतर मनीष पांडेने पुढील षटकात खणखणीत षटकार खेचला आणि तेव्हा मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी ( Akash Ambani) चिडलेले दिसले. त्यात लोकेशने पुढील दोन चेंडू चौकार खेचले. लोकेश व मनीष यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली.  लोकेशने ३७ चेंडूंत अर्धशतकही पूर्ण केले. मुंबई इंडियन्सविरुद्ध लोकेशची ही ८ वी 50+ धावांची खेळी ठरली आणि त्याने सुरेश रैनाचा ( ७) विक्रम मोडला. Most fifty-plus score vs MI in IPL लोकेशने मुंबई इंडियन्सविरुद्ध ८०च्या सरासरीने ८००+ धावा पूर्ण केल्या. 

१२व्या षटकात किरॉन पोलार्डने ही जोडी तोडली. पोलार्डच्या स्लोव्हर बाऊन्सरवर फटका मारण्यासाठी मनीष पुढे आला आणि त्याचा फटका चूकला. रिले मेरेडिथने सुरेख कॅच घेत मनीषला २२ धावांवर माघारी जावे लागले. मनीष व लोकेशची ५८ धावांची भागीदारी संपुष्टात आली. मार्कस स्टॉयनिस भोपळ्यावर बाद झाला. पोलार्डने लखनौला आणखी एक धक्का दिला. कृणाल पांड्याही १ धावेवर बाद झाला. कृणालची विकेट घेतल्यानंतर पोलार्डने हाताची घडी घालून सेलिब्रेशन केलं. Kieron Pollard gives a silent send off to Krunal

पाहा व्हिडीओ... 
 

Web Title: IPL 2022 MI vs LSG Live Updates : Kieron Pollard gives a silent send off to Krunal Pandya, watch video of  Krunal Pandya Wicket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.