IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : १०८३ दिवसांनी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर परतलेल्या मुंबई इंडियन्सचा जोश परतलेला पाहायला मिळाला. त्यात मुंबईचा स्टार किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) याने कर्णधार रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवला आणि लखनौ सुपर जायंट्सला दोन मोठे धक्के दिले. कृणाल पांड्याची ( Krunal Pandya) विकेट मिळवल्यानंतर पोलार्डने केलेले सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरले.
९व्या षटकाच्या दुसऱ्या षटकात लोकेश राहुलला रन आऊट करण्याची संधी रोहितकडून थोडक्यात हुकली. त्यानंतर मनीष पांडेने पुढील षटकात खणखणीत षटकार खेचला आणि तेव्हा मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी ( Akash Ambani) चिडलेले दिसले. त्यात लोकेशने पुढील दोन चेंडू चौकार खेचले. लोकेश व मनीष यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. लोकेशने ३७ चेंडूंत अर्धशतकही पूर्ण केले. मुंबई इंडियन्सविरुद्ध लोकेशची ही ८ वी 50+ धावांची खेळी ठरली आणि त्याने सुरेश रैनाचा ( ७) विक्रम मोडला. Most fifty-plus score vs MI in IPL लोकेशने मुंबई इंडियन्सविरुद्ध ८०च्या सरासरीने ८००+ धावा पूर्ण केल्या.
१२व्या षटकात किरॉन पोलार्डने ही जोडी तोडली. पोलार्डच्या स्लोव्हर बाऊन्सरवर फटका मारण्यासाठी मनीष पुढे आला आणि त्याचा फटका चूकला. रिले मेरेडिथने सुरेख कॅच घेत मनीषला २२ धावांवर माघारी जावे लागले. मनीष व लोकेशची ५८ धावांची भागीदारी संपुष्टात आली. मार्कस स्टॉयनिस भोपळ्यावर बाद झाला. पोलार्डने लखनौला आणखी एक धक्का दिला. कृणाल पांड्याही १ धावेवर बाद झाला. कृणालची विकेट घेतल्यानंतर पोलार्डने हाताची घडी घालून सेलिब्रेशन केलं. Kieron Pollard gives a silent send off to Krunal
पाहा व्हिडीओ...