Most bizarre dismissal in IPL? IPL 2022, MI vs LSG : बॅट, बूट अन् OUT!; Ishan Kishan चं नशिबच फुटकं, Mumbai Indians चा फलंदाज विचित्र पद्धतीने झाला बाद, Video 

IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : घरच्या मैदानावर आयपीएल २०२२मधील पहिलाच सामना खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने सुरुवात तर चांगली केली. पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 10:38 PM2022-04-24T22:38:12+5:302022-04-24T22:38:47+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 MI vs LSG Live Updates : Most bizarre dismissal in IPL? Ishan Kishan’s unusual wicket, Under edge into de Kock's boot and then Holder takes the catch at slip, Video  | Most bizarre dismissal in IPL? IPL 2022, MI vs LSG : बॅट, बूट अन् OUT!; Ishan Kishan चं नशिबच फुटकं, Mumbai Indians चा फलंदाज विचित्र पद्धतीने झाला बाद, Video 

Most bizarre dismissal in IPL? IPL 2022, MI vs LSG : बॅट, बूट अन् OUT!; Ishan Kishan चं नशिबच फुटकं, Mumbai Indians चा फलंदाज विचित्र पद्धतीने झाला बाद, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : घरच्या मैदानावर आयपीएल २०२२मधील पहिलाच सामना खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने सुरुवात तर चांगली केली. लोकेश राहुलच्या शतकानंतरही मुंबईच्या गोलंदाजांनी लखनौ सुपर जायंट्सला १६८ धावांपर्यंत मजल मारू दिली. त्यानंतर रोहित शर्मा व इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. रोहितचा फॉर्म परतलेला दिसला आणि त्याच्या चौकार- षटकारांनी वानखेडे स्टेडियम दणाणून गेले. पण, रवी बिश्नोईने (  Ravi Bishnoi) त्याच्या पहिल्याच षटकात ही जोडी तोडली. विचित्र पद्धतीने इशान किशन ( Ishan Kishan Wicket) याची विकेट पडली. 


लोकेश राहुलने ( KL Rahul) शतकी खेळी करताना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा एकट्याने सामना केला. लखनौ सुपर जायंट्सच्या ६ बाद १६८ धावांमध्ये लोकेशच्या ६२ चेंडूंत नाबाद १०३ धावा होत्या, तर अन्य फलंदाजांनी ५७ धावा केल्या.  लोकेश राहुलने MI च्या गोलंदाजांची पुन्हा धुलाई करताना यंदाच्या पर्वातील दुसरे शतक झळकावले. आयपीएलमधील त्याचे हे चौथे, तर मुंबईविरुद्धचे तिसरे शतक ठरले. या कामगिरीसह त्याने विश्वविक्रमाला गवसणी घातली. 

कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉक १० धावांवर बाद झाला. लोकेश राहुलने मनीष पांडेसह ( २२)  दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. मार्कस स्टॉयनिस भोपळ्यावर बाद झाला. कृणाल पांड्या ( १), दीपक हुडा ( १०) व आयुष बदोनी ( १४) हेही फार काही करू शकले नाही. मुंबईकडून रिले मेरेडिथ व किरॉन पोलार्ड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. डॅनिएल सॅम्स व जसप्रीत बुमराह यांना एक विकेट मिळाली. लोकेशने ६१ व्या चेंडूवर षटकार खेचून शतक पूर्ण केले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच संघाविरुद्ध तीन शतक झळकावणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला. लोकेश ६२ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारांसह १०३ धावांवर नाबाद राहिला. लखनौने ६ बाद १६८ धावांचा डोंगर उभा केला.

इशान ८ धावांवर बाद झाल्यानंतर मोहसिन खानने मुंबईच्या डेवॉल्ड ब्रेव्हिसला (  ३) बाद केले. त्यानंतर कृणाल पांड्याने LSG ला मोठे यश मिळवून दिले. रोहित ३९ धावांवर बाद झाला. आठव्या षटकाचा पहिला चेंडू Wide जात होता इशान त्याला छेडायला गेला आणि चेंडू बॅटची किनार घेत यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकच्या बूटावर आदळून उंच उडाला. स्लीपमध्ये उभ्या असलेल्या जेसन होल्डरने तो टिपला. त्याच्याही हातून तो चेंडू सुटलाच होता. 

पाहा व्हिडीओ..

 

Web Title: IPL 2022 MI vs LSG Live Updates : Most bizarre dismissal in IPL? Ishan Kishan’s unusual wicket, Under edge into de Kock's boot and then Holder takes the catch at slip, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.