Join us  

IPL 2022, MI vs LSG : Mumbai Indiansचं पॅक अप; आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लाजीरवाणी कामगिरी, लखनौ लय भारी!

IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : मुंबई इंडियन्सने विजयासाठी आणखी काय करायला हवं?; लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या लढतीत गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतरही मुंबईला ८वा पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 11:38 PM

Open in App

IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : मुंबई इंडियन्सने विजयासाठी आणखी काय करायला हवं?; लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या लढतीत गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतरही मुंबईला ८वा पराभव पत्करावा लागला. रोहित शर्मा ( Rohit Sharma) ने दमदार खेळे केला. पण, मधल्या फळीने माती खाल्ली... १९वर्षीय तिलक वर्मा ( Tilak Varma) एकटा LSGच्या गोलंदाजांना भिडला, परंतु जेसन होल्डरच्या अनुभवासमोर तो अपयशी ठरली. किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) मैदानावर होता, परंतु तो बघ्याच्या भूमिकेतच दिसला. लखनौ गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. आयपीएलमध्ये सलग ८ पराभव पत्करणारा मुंबई हा पहिलाच संघ ठरला आणि यंदाच्या आयपीएलमधूनही त्यांचे पॅक अप झाले. 

१६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. रोहितचा फॉर्म परतलेला दिसला आणि त्याच्या चौकार- षटकारांनी वानखेडे स्टेडियम दणाणून गेले. पण, रवी बिश्नोईने (  Ravi Bishnoi) त्याच्या पहिल्याच षटकात ही जोडी तोडली. विचित्र पद्धतीने इशान किशन ( Ishan Kishan Wicket) याची विकेट पडली. इशान ८ धावांवर बाद झाल्यानंतर मोहसिन खानने मुंबईच्या डेवॉल्ड ब्रेव्हिसला (  ३) बाद केले. त्यानंतर कृणाल पांड्याने LSG ला मोठे यश मिळवून दिले. रोहित ३९ धावांवर बाद झाला. आठव्या षटकाचा पहिला चेंडू Wide जात होता इशान त्याला छेडायला गेला आणि चेंडू बॅटची किनार घेत यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकच्या बूटावर आदळून उंच उडाला. स्लीपमध्ये उभ्या असलेल्या जेसन होल्डरने तो टिपला.  

 सूर्यकुमार यादवही (७) लगेच माघारी परतल्याने मुंबई इंडियन्सच्या सर्व आशा किरॉन पोलार्ड व तिलक वर्मावर लागल्या होत्या. पण, धावा व चेंडू यामधील तफावतही वाढली होती. मुंबईला ४२ चेंडूंत ९२ धावा करायच्या होत्या. रवी बिश्नोईने टकलेल्या १४व्या षटकात तिलक वर्माने दोन खणखणीत षटकार खेचून एकूण १६ धावा कुटल्या. मोहसिन खानने १५व्या षटकात ५ धावा देत चांगले कमबॅक केले. स्टेडियमवर पोलार्ड, पोलार्डचा नारा घुमला... १९ वर्षीय तिलकने चांगला खेळ केला, यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला. तिलक व पोलार्ड यांनी ३१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. 

१७व्या षटकात पोलार्डने षटकार खेचूनही मोहसिनने ९ धावाच दिल्या. मुंबईला १८ चेंडूंत ५० धावा हव्या होत्या. मोहसिनने ४ षटकांत २७ धावांत १ विकेट घेतली. १८व्या षटकात जेसन होल्डरने मुंबईला मोठा धक्का दिला. तिलक ३८ धावांवर झेलबाद झाला.  १२ चेंडूंत ४४ धावांची गरज असताना सर्व मदार पोलार्डवरच होती. दुष्मंथा चमिराने १९व्या षटकात केवळ पाच धावा दिल्याने मुंबईला आता ६ चेंडूंत ३९ धावा करायच्या होत्या. त्या दडपणात २०व्या षटकात पोलार्ड ( १९)  विकेट गमावून बसला. कृणालने त्याला बाद करत परतफेड केली. जयदेव उनाडकत धावबाद झाला. डॅनिएल सॅम्सही भोपळ्यावर बाद झाला. मुंबईला ८ बाद १३२ धावा करता आल्या आणि लखनौने ३६ धावांनी सामना जिंकला.

घरच्या मैदानावर आयपीएल २०२२मधील पहिलाच सामना खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने सुरुवात तर चांगली केली. लोकेश राहुलच्या शतकानंतरही मुंबईच्या गोलंदाजांनी लखनौ सुपर जायंट्सला १६८ धावांपर्यंत मजल मारू दिली. LSG च्या ६ बाद १६८ धावांमध्ये लोकेशच्या ६२ चेंडूंत नाबाद १०३ धावा होत्या, तर अन्य फलंदाजांनी ५७ धावा केल्या.  क्विंटन डी कॉक १० धावांवर बाद झाला. लोकेश राहुलने मनीष पांडेसह ( २२)  दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. मार्कस स्टॉयनिस भोपळ्यावर बाद झाला. कृणाल पांड्या ( १), दीपक हुडा ( १०) व आयुष बदोनी ( १४) हेही फार काही करू शकले नाही. मुंबईकडून रिले मेरेडिथ व किरॉन पोलार्ड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. डॅनिएल सॅम्स व जसप्रीत बुमराह यांना एक विकेट मिळाली. 

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सलखनौ सुपर जायंट्सरोहित शर्मा
Open in App