IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : सलग सात पराभव पत्करावा लागलेला मुंबई इंडियन्सचा संघ IPL 2022 मध्ये आज घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायंट्सचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरला. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आयपीएल २०२२त वानखेडेवर झालेल्या मागील तीन सामन्यांत पहिली फलंदाजी करणारा संघ जिंकला असूनही रोहितच्या निर्णयाचे सर्वांना आश्चर्य वाटले.
क्विंटन डी कॉक व लोकश राहुल यांना फटकेबाजी करताना पाहून रोहितचा निर्णय चुकला, असेच दिसत होते. त्यात तिलक वर्माने चौथ्या षटकात क्विंटनचा झेल सोडला व तो षटकार घेतला. पण, जसप्रीत बुमराहने पुढच्याच चेंडूवर त्याची भरपाई केली आणि रोहित शर्माने सुरेख झेल टिपला. क्विंटन १० धावांवर बाद झाला. मुंबईच्या गोलंदाजांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये चांगला दबाव बनवला आणि LSG ला १ बाद ३२ धावाच करता आल्या. लोकेश राहुल संयमी खेळ करताना दिसला आणि तो विकेट टिकवून ठेवताना लखनौचा धावफलक हलता ठेवत होता.
९व्या षटकाच्या दुसऱ्या षटकात लोकेश राहुलला रन आऊट करण्याची संधी रोहितकडून थोडक्यात हुकली. जयदेव उनाडकतच्या गोलंदाजीवर लोकेशने हलका फटका मारला व चोरटी धाव घेण्यासाठी धावला. शॉर्ट कव्हरला उभ्या असलेल्या रोहितने चेंडू नॉन स्ट्रायकर एंडला धावत असलेल्या लोकेशच्या दिशेने फेकला. चेंडू यष्टिंच्या अगदी जवळून गेला. लोकेशची विकेट पडता पडता राहिली. त्यामुळे रोहित स्वतःवर नाराज दिसला. लोकेशने त्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून रोहितच्या जखमेवर आणखी मिठ चोळले.
त्यानंतर मनीष पांडेने पुढील षटकात खणखणीत षटकार खेचला आणि तेव्हा मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी ( Akash Ambani) चिडलेले दिसले. त्यात लोकेशने पुढील दोन चेंडू चौकार खेचले.लोकेश व मनीष यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. लोकेशने ३७ चेंडूंत अर्धशतकही पूर्ण केले.
Web Title: IPL 2022 MI vs LSG Live Updates : Mumbai Indians owner Akash Ambani erupts After Manish Pandey hit six, Rohit Sharma's face shows frustration; See what happened
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.