IPL 2022, MI vs LSG Live Updates : मुंबई इंडियन्सच्या पारड्यात नाणेफेकीचा कौल पडला; पण, रोहित शर्मा निर्णय घेण्यात 'चूक'ला!

IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात मुंबई इंडियन्स आज तरी पहिल्या विजयाची नोंद करेल अशी चाहत्यांना आशा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 07:06 PM2022-04-24T19:06:43+5:302022-04-24T19:16:09+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 MI vs LSG Live Updates : Mumbai won the toss and decided to bowl first, LSG Avesh Khan is not playing due to a niggle | IPL 2022, MI vs LSG Live Updates : मुंबई इंडियन्सच्या पारड्यात नाणेफेकीचा कौल पडला; पण, रोहित शर्मा निर्णय घेण्यात 'चूक'ला!

IPL 2022, MI vs LSG Live Updates : मुंबई इंडियन्सच्या पारड्यात नाणेफेकीचा कौल पडला; पण, रोहित शर्मा निर्णय घेण्यात 'चूक'ला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात मुंबई इंडियन्स आज तरी पहिल्या विजयाची नोंद करेल अशी चाहत्यांना आशा आहे. सलग सात पराभवांमुळे मुंबई इंडियन्सचे IPL 2022च्या प्ले ऑफच्या आशा जवळपास संपल्यात जमा आहेत. पण, सचिन तेंडुलकरला वाढदिवसाची भेट म्हणून विजय मिळवण्याचा रोहित शर्मा अँड कंपनीचा प्रयत्न असेल. त्यांच्यासमोर आज लखनौ सुपर जायंट्सचे ( LSG) आव्हान आहे.  जवळपास १०८३ दिवसानंतर मुंबई इंडियन्सचा संघ वानखेडे ( Wankhede) स्टेडियमवर खेळणार आहे. 


रोहित शर्माची बॅट अजून हवी तशी तळपलेली नाही, परंतु वानखेडेवर त्याचा फॉर्म परत येईल, अशी अपेक्षा आहे. येथे रोहितने ३४.६६च्या सरासरीने १७३३ धावा केल्या आहेत आणि त्यात १४ अर्धशतकांचा समावेश आहे. २०१८मध्ये येथे त्याने रॉयल चॅलेंजर्स  बंगळुरूविरुद्ध ९४ धावांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी खेळली होती. रोहित व इशान किशन यांचा फॉर्म यांच्यासह गोलंदाजांची कामगिरी ही मुंबईसाठी डोकेदुखी ठरलेली आहे. किरॉन पोलार्डही फार कमाल दाखवू शकलेला नाही. मुंबई इंडिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण, वानखेडेवरील मागील तीन सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. त्यामुळे रोहितची ही चूक संघाला महागात पडणार नाही अशी प्रार्थना करूया. 


 प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णयावर रोहित म्हणाला, वानखेडेवर परतून चांगलं वाटतंय, इथे खूप चांगल्या आठवणी आहेत. आमचा संघ नवा आहे आणि चांगला खेळ करण्यात यशस्वी होऊ, याची खात्री ठेवायला हवी. आशा करतो की आम्ही चांगला खेळ करू. इथे आम्ही बरेच क्रिकेट खेळलो आहोत, त्यामुळे इथे धावांचा पाठलाग करू शकतो.  

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, इशान किशन, डेवॉल्ड ब्रेव्हिस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, हृतिक शोकिन, जयदेव उनाडकत, डॅनिएल सॅम्स, रिली मेरेडिथ, जसप्रीत बुमराह 

लखनौ सुपर जायंट्स - लोकेश राहुल, क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, दीपक हुडा, कृणाल पांड्या, आयुष बदोनी, मार्कस स्टॉयनिस, जेसन होल्डर, दुष्मंथा चमिरा, मोहसिन खान, रवी बिश्नोई 

Web Title: IPL 2022 MI vs LSG Live Updates : Mumbai won the toss and decided to bowl first, LSG Avesh Khan is not playing due to a niggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.