IPL 2022, Mumbai Indians vs Lucknow Super Giants : लोकशे राहुलच्या ( KL Rahul) शतकी खेळीनंतरही मुंबईच्या गोलंदाजांनी लखनौ सुपर जायंट्सना १६८ धावांपर्यंत रोखले. पण, हे माफक लक्ष्य पेलण्यात मुंबईचे फलंदाज असमर्थ ठरले. मुंबईला ८ बाद १३२ धावा करता आल्या. इशान किशन, सूर्यकुमार यादव, डेवॉल्ड ब्रेव्हिस यांचे अपयश लखनौच्या पथ्यावर पडले. किरॉन पोलार्ड खेळपट्टीवर असूनही नसल्यासारखाच खेळला. १९वर्षीय तिलक वर्मा ( Tilak Varma) एकटा LSGच्या गोलंदाजांना भिडला.
LSG च्या ६ बाद १६८ धावांमध्ये लोकेशच्या ६२ चेंडूंत नाबाद १०३ धावा होत्या, तर अन्य फलंदाजांनी ५७ धावा केल्या. क्विंटन डी कॉक १० धावांवर बाद झाला. लोकेश राहुलने मनीष पांडेसह ( २२) दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. मार्कस स्टॉयनिस ( ०), कृणाल पांड्या ( १), दीपक हुडा ( १०) व आयुष बदोनी ( १४) हेही फार काही करू शकले नाही. मुंबईकडून रिले मेरेडिथ व किरॉन पोलार्ड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. डॅनिएल सॅम्स व जसप्रीत बुमराह यांना एक विकेट मिळाली.
१६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. इशान ( ८) दुर्दैवरित्या बाद झाला. डेवॉल्ड ब्रेव्हिस ( ३) व सूर्यकुमार यादव ( ७) झटपट माघारी परतले. रोहितही नंतर ३९ धावांवर बाद झाला. तिलक वर्मा ( ३८) सोडला तर अन्य फलंदाजांनी जिंकण्यासाठी प्रयत्नच केले नाही. किरॉन पोलार्ड २० चेंडूंत १९ धावा करून अखेरच्या षटकात माघारी परतला. कृणाल पांड्याने अखेरच्या षटकात तीन धक्के दिले आणि मुबंईला ८ बाद १३८ धावांवरच समाधान मानावे लागले. कृणालने १९ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
रोहित शर्मा काय म्हणाला?
मला वाटले की आम्ही चांगली गोलंदाजी केली. फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी होती, पण आम्हाला अपयश आले. या लक्ष्याचा आम्ही पाठलाग करायला हवा होता. असे लक्ष्य असताना तुम्हाला भागीदारीची गरज असते आणि तेच आमच्याकडून झाले नाही. माझ्यासह आमच्या फलंदाजांनी काही बेजबाबदार फटके मारले. त्यांनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही स्पर्धेत चांगली फलंदाजी केलेली नाही, असे रोहितने कबुल केले.
तो पुढे म्हणाला, तुमच्या फलंदाजाने एक मोठी खेळी करावी, हे अपेक्षित होते. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूने ते करून दाखवले आणि त्याचा आम्हाला सर्वात मोठा फटका बसला. ज्यांना संधी मिळेल, त्यांनी धावा करायला हव्यात. त्यामुळे आम्ही जास्त बदल न करण्याचा प्रयत्न करतो. जो खेळतो त्याला पुरेशा संधी मिळायला हव्यात.
Web Title: IPL 2022 MI vs LSG Live Updates : Rohit Sharma said "We haven't batted well this season, included myself, failed to make longer innings"
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.