Mumbai Indians IPL 2022 : मुंबई इंडियन्स आज हरली तर काय होणार?; ८ वर्षांपूर्वी झालेली अशी अवस्था, तेव्हा काय निकाल लागलेला माहित्येय?

IPL 2022, MI vs PBKS Live : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४ पैकी ९ जेतेपदं ही मुंबई इंडियन्स ( ५ ) व चेन्नई सुपर किंग्स (  ४) या दोन तगड्या संघांच्या नावावर आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 01:33 PM2022-04-13T13:33:33+5:302022-04-13T13:34:23+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, MI vs PBKS Live : Big game for Mumbai Indians tonight. Had lost their first 5 in 2014 & first 4 games in 2015: qualified for the playoffs in 2014 & won in 2015 | Mumbai Indians IPL 2022 : मुंबई इंडियन्स आज हरली तर काय होणार?; ८ वर्षांपूर्वी झालेली अशी अवस्था, तेव्हा काय निकाल लागलेला माहित्येय?

Mumbai Indians IPL 2022 : मुंबई इंडियन्स आज हरली तर काय होणार?; ८ वर्षांपूर्वी झालेली अशी अवस्था, तेव्हा काय निकाल लागलेला माहित्येय?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, MI vs PBKS Live : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४ पैकी ९ जेतेपदं ही मुंबई इंडियन्स ( ५ ) व चेन्नई सुपर किंग्स (  ४) या दोन तगड्या संघांच्या नावावर आहेत. पण, IPL 2022 मध्ये या दोन्ही संघांना पहिल्या चार सामन्यांत हार मानावी लागली आणि गुणतालिकेत तळाच्या स्थानासाठी दोघांमध्ये शर्यत रंगली... मंगळवारी चेन्नई सुपर किंग्सने ( CSK) पराभवाची मालिका खंडित केली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर २३ धावांनी विजय नोंदवला. या विजयामुळे आता चेन्नई ९व्या क्रमांकावर सरकले आहेत आणि Mumbai Indians तळाला आहे. आज मुंबईचा सामना पंजाब किंग्सशी ( PBKS) होणार असून मयांक अग्रवालच्या नेतृत्वाखालील हा संघ ४ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. 

मुंबई इंडियन्ससाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. लखनौ सुपर जायंट्स व गुजरात टायटन्स या दोन नवीन  संघांच्या आगमनामुळे आयपीएल २०२२मधील जेतेपदाची चुरस अधिक वाढली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी मार्ग सोपा नक्की नसेल. त्यात मुंबईला डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाजाची उणीव प्रकर्षाने जाणवत आहेत. ट्रेंट बोल्टची जागा भरून काढणारा गोलंदाज त्यांच्याकडे नाही. हार्दिक पांड्याचाही पर्यात मुंबईला शोधता आलेला नाही. अशात आजही मुंबई हरली तर काय होईल?

स्पर्धेचा फॉरमॅट काय सांगतो?
संघसंख्या ८ वरून १० झाली असली तरी यंदा प्रत्येकी संघाच्या वाट्याला १४ सामने ठेवले आहे. मुंबई इंडियन्सला अ गटात  कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स या संघांसोबत स्थान दिले गेले आहे. त्यानुसार मुंबईला गटातील संघांसोबत दोनवेळा खेळावे लागेल आणि ब गटातील अव्वल संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्सशी दोन वेळा भिडणार आहे व अन्य हैदराबाद, बंगळुरू, पंजाब व गुजरात यांच्याविरुद्ध एकच सामना खेळणार आहेत.

मुंबई इंडियन्स आतापर्यंत कोणाकोणाला भिडले?


२०१४ व २०१५ चा इतिहास पाहा
आयपीएलमध्ये २०१४ साली मुंबई इंडियन्सने सलग पाच सामने गमावले होते आणि २०१४ मध्ये सलग चार सामन्यांत त्यांची हार झाली होती. पण, २०१४ मध्ये त्यांनी प्ले ऑफमध्ये एन्ट्री मारली होती, तर २०१५मध्ये त्यांनी जेतेपद पटकावले होते.

Web Title: IPL 2022, MI vs PBKS Live : Big game for Mumbai Indians tonight. Had lost their first 5 in 2014 & first 4 games in 2015: qualified for the playoffs in 2014 & won in 2015

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.