Join us  

Rohit Sharma IPL 2022 MI vs RCB Live Updates : Mumbai Indians सलग चौथ्यांदा हरले, कर्णधार रोहित शर्माने बघा कोणावर खापर फोडले, Video   

मुंबई इंडियन्सचा हा IPL 2022 मधील सलग चौथा पराभव ठरला. मुंबई इंडियन्सने विजयासाठी ठेवलेले १५२ धावांचे लक्ष्य बंगळुरूने ७ विकेट्स व ९ चेंडू राखून सहज पार केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 12:13 AM

Open in App

IPL 2022 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live Updates : अनुज रावत आणि विराट कोहली यांनी दमदार खेळ करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सहज विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्सचा हा IPL 2022 मधील सलग चौथा पराभव ठरला. मुंबई इंडियन्सने विजयासाठी ठेवलेले १५२ धावांचे लक्ष्य बंगळुरूने ७ विकेट्स व ९ चेंडू राखून सहज पार केले.  अनुज रावतने ४७ चेंडूंत ६६ धावांची मॅच विनिंग खेळी केली आणि त्याला मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. विराट कोहली ४८ धावांवर दुर्दैवीरित्या बाद झाला. ५ वेळा आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) नाराज दिसला आणि त्याने सामन्यानंतर ती व्यक्तही केली. 

रोहित शर्मा व इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या, परंतु पुढील २९ धावांत त्यांच्या ६ विकेट्स पडल्या. सूर्यकुमार यादवने ७व्या विकेटसाठी जयदेव उनाडकतसह  ४१ चेंडूंत ७२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने  ६८ धावा चोपल्या. जयदेव १३ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी मुंबईला ६ बाद १५१ धावांपर्यंत पोहोचवले.  RCB कडून हर्षल पटेल ( २-२३) व वनिंदू हसरंगा ( २-२८) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ग्लेन मॅक्सवेलने एक अप्रतिम रन आऊट केला आणि आकाश दीपने एक बळी टिपला.

प्रत्युत्तरात अनुज रावत ( Anuj Rawat ) आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी  ८ षटकांत ५० धावा फलकावर चढवल्या. उनाडकतने ९व्या षटकात फॅफल ( १६) बाद केले. त्यानंतर रावत व विराट कोहली यांनी ५२ चेंडूंत ८० धावांची भागीदारी केली. रावतने ४७ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांनी ६६ धावांची खेळी केली. १९व्या षटकात डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या गोलंदाजीवर विराट LBW झाला. अम्पायरच्या या निर्णयावर विराट नाराज दिसला. त्याने ३६ चेंडूंत ५ चौकारांसह ४८ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने सलग दोन चौकार खेचून RCBचा विजय पक्का केला.  

रोहित शर्मा काय म्हणाला?मुंबई इंडियन्स आजच्या सामन्यात किरॉन पोलार्ड आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस या दोन परदेशी खेळाडूंसह मैदानावर उतरले होते. त्यावर रोहित म्हणाला, आमच्याकडे जे उपलब्ध खेळाडू आहेत त्यातून चांगले निवडून मैदानावर संघ उतरवला. अजूनही आमचे काही परदेशी खेळाडू यायचे आहेत. मला आणखी काही काळ मैदानावर फलंदाजी करायला हवी होती, परंतु चुकीच्या वेळी मी बाद झालो. इशान व मी ५० धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात केली, परंतु त्यानंतर आमच्या पटापट विकेट पडल्या. त्याने खूप मोठा फटका बसला. या खेळपट्टीवर १५० धावा पुरेशा नव्हत्या. पण, सूर्यकुमार यादवला श्रेय द्यायला हवं, त्यानं चतुराईने फलंदाजी केली. आमच्या तळाच्या फलंदाजांनी आणखी चांगली फलंदाजी करायला हवी. जर तुम्ही धावा केल्या, तर गोलंदाजांना त्याचा बचाव करता येईल.'' 

टॅग्स :आयपीएल २०२२रोहित शर्मामुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App