Arjun Tendulkar IPL 2022, MI vs RR Live Updates : मुंबई इंडियन्सची प्रतिष्ठा पणाला; अर्जुन तेंडुलकरच्या कानामागून आला अन् तिखट झाला; मध्य प्रदेशच्या गोलंदाजाला संधी 

IPL 2022, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातून बाद होणारा पहिला संघ ठरलेला मुंबई इंडियन्स आता प्रतिष्ठा वाचवण्यासाठी खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 07:14 PM2022-04-30T19:14:25+5:302022-04-30T19:15:15+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, MI vs RR Live Updates : Mumbai Indians have won the toss and they've decided to bowl first, No arjun Tendulkar in Playing XI, MP boy Kumar Kartikeya make debute | Arjun Tendulkar IPL 2022, MI vs RR Live Updates : मुंबई इंडियन्सची प्रतिष्ठा पणाला; अर्जुन तेंडुलकरच्या कानामागून आला अन् तिखट झाला; मध्य प्रदेशच्या गोलंदाजाला संधी 

Arjun Tendulkar IPL 2022, MI vs RR Live Updates : मुंबई इंडियन्सची प्रतिष्ठा पणाला; अर्जुन तेंडुलकरच्या कानामागून आला अन् तिखट झाला; मध्य प्रदेशच्या गोलंदाजाला संधी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातून बाद होणारा पहिला संघ ठरलेला मुंबई इंडियन्स आता प्रतिष्ठा वाचवण्यासाठी खेळणार आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर त्यांचा सामना रंगणार आहे. मुंबईला यंदाच्या पर्वात ८ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे आणि आयपीएल इतिहासात सलग ८ सामने गमावणारा हा पहिलाच संघ ठरला आहे. पाच जेतेपदं नावावर असणाऱ्या मुंबई इंडियन्सला नव्या खेळाडूंची घडी बसवण्यात अपयश आल्याचे या निकालांनी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता उरलेल्या सामन्यांत युवा खेळाडूंना संधी द्यावी अशी मागणी होत आहेत. त्यात अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) हे नाव आघाडीवर होते. पण, गुरुवारी करारबद्ध केलेल्या मध्य प्रदेशच्या गोलंदाजाला मुंबईने पदार्पणाची संधी दिली, अर्जुनला नाही. आज कॅप्टन रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला वाढदिवसाची भेट मिळते का, याचीही उत्सुकता आहे.


मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम डेव्हिड व कुमार कार्तिकेया यांना संघात स्थान दिले आहे. त्यांच्यासाठी डेवाल्ड ब्रेव्हिस व जयदेव उनाडकत यांना बाकावर बसवले आहे. मुंबई इंडियन्सने मध्य प्रदेशाचा डावखुरा गोलंदाज कुमार कार्तिकेय सिंग याला (   Kumar Kartikeya Singh ) गुरुवारी आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. मुंबईचा गोलंदाज मोहम्मद अर्षद खान  ( Md. Arshad Khan ) याला दुखापतीमुळे आयपीएल २०२२मधून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्याजागी मुंबईने कुमार सिंगला करारबद्ध केले आहे.  कुमार कार्तिकेय सिंग हा मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट टीमचा सदस्य आहे आणि त्याला आता करारबद्ध करण्यात आले आहे. आज तो मुंबईकडून पदार्पण करतोय. 

रोहित म्हणाला, तयारी तर पूर्ण केली आहे, आशा करतो की आज विजय मिळवू...  विजय मिळवण्यावरच आमचे संपूर्ण लक्ष आहे.  


मुंबई इंडियन्सचा संघ -  रोहित शर्मा, इशान किशन, टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, हृतिक शोकीन, डॅनिएल सॅम्स, कुमार कार्तिकेय, रिली मेरेडिथ, जसप्रीत बुमराह ( Playing XI: Rohit Sharma (c), Ishan Kishan (wk), Tim David, Suryakumar Yadav, Tilak Varma, Kieron Pollard, Hrithik Shokeen, Daniel Sams, Kumar Kartikeya, Riley Meredith, Jasprit Bumrah) 

Web Title: IPL 2022, MI vs RR Live Updates : Mumbai Indians have won the toss and they've decided to bowl first, No arjun Tendulkar in Playing XI, MP boy Kumar Kartikeya make debute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.