Ishan Kishan Tilak Varma, IPL 2022 MI vs RR Live: राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी करत मुंबईला १९४ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या डावाची सुरूवात खराब झाली. पण त्यानंतर मुंबई संघाची 'डावी आघाडी' इशान किशन आणि तिलक वर्मा या दोघांनी दमदार कामगिरी केली. या दोघांनीही फटकेबाजी करत अर्धशतकं ठोकली. त्या दोघांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला आव्हानाचा पाठलाग करण्याचं बळ मिळालं. इशान किशन ५ चौकार आणि एक षटकारासह ५४ धावा केल्या. तर तिलक वर्माने ३३ चेंडूत ३ चौकार ५ षटकारांसह ६१ धावा केल्या.
राजस्थानच्या डावात यशस्वी जैस्वाल (१) आणि देवदत्त पडीक्कल (७) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर जोस बटलरने तुफान फटकेबाजी केली. त्याने बेसिल थंपीला एका षटकात २६ धावा झोडल्या. संजू सॅमसन ३० धावांवर बाद झाल्यानंतर शिमरॉन हेटमायरने बटलरला साथ देत १४ चेंडूत ३५ धावा केल्या. जोस बटलरने १९व्या षटकापर्यंत तग धरला. त्याने तुफानी खेळी करत शतक ठोकलं. जोस बटलरने ६८ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकारांच्या साथीने १०० धावांची धुवांधार खेळी केली.
मुंबई इंडियन्सचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (किपर), अनमोलप्रीत सिंग, टिळक वर्मा, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी
राजस्थान रॉयल्सचा संघ: जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार, किपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, प्रसीध कृष्णा