Mumbai Indians Play Offs IPL 2022, MI vs RR Live Updates : ८ पराभवानंतर मुंबई इंडियन्स अखेर जिंकले, रोहित शर्माला बर्थ डेचं गिफ्ट दिले; Play Off च्या शर्यतीत परतले?

Mumbai Indians have finally got the first 2 point कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) चा अपयशाचा पाढा कायम राहिला असला तरी सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) त्याला बर्थ डेचं विजयी गिफ्ट दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 11:41 PM2022-04-30T23:41:15+5:302022-04-30T23:50:12+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, MI vs RR Live Updates : Mumbai Indians registered first win after 8 defeat, beat Rajasthan Royals by 5 wickets; know about their play off chance  | Mumbai Indians Play Offs IPL 2022, MI vs RR Live Updates : ८ पराभवानंतर मुंबई इंडियन्स अखेर जिंकले, रोहित शर्माला बर्थ डेचं गिफ्ट दिले; Play Off च्या शर्यतीत परतले?

Mumbai Indians Play Offs IPL 2022, MI vs RR Live Updates : ८ पराभवानंतर मुंबई इंडियन्स अखेर जिंकले, रोहित शर्माला बर्थ डेचं गिफ्ट दिले; Play Off च्या शर्यतीत परतले?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : मुंबई इंडियन्सने अखेर ८ पराभवानंतर विजयाची चव चाखली. कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) चा अपयशाचा पाढा कायम राहिला असला तरी सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) त्याला बर्थ डेचं विजयी गिफ्ट दिले. मुंबई इंडियन्सने ५ विकेट्स राखून राजस्थान रॉयल्सवर ( MI vs RR) विजय मिळवून गुणांचे खाते उघडले. मुंबई इंडियन्सनं आज खऱ्या अर्थाने सांघिक खेळ केला आणि त्याचा फायदा झालेला दिसला. सूर्यकुमार यादवला तिलक वर्माची ( Tilak Varma) दमदार साथ लाभली. या दोघांना तीन चेंडूंत युजवेंद्र चहल व प्रसिद्ध कृष्णा यांनी माघारी पाठवून सामन्याला कलाटणी दिली होती. पण, टीम डेव्हिडने त्याची भूमिका चोख वटवली. या विजयामुळे मुंबईच्या प्ले ऑफच्या आशा जीवंत झाल्या का? Mumbai Indians have finally got the first 2 point

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशनने थर्ड मॅनला षटकार खेचून MIच्या चाहत्यांना आश्वासक चित्र दाखवले, परंतु तिसऱ्याच षटकात आर अश्विनला गोलंदाजीला आणून RR ने मोठा डाव खेळला. अश्विनने फिरकीच्या जाळ्यात रोहितला अडकवले आणि डॅरील मिचेलने सोपा झेल घेत त्याला २ धावांवर माघारी पाठवले. किशन १८ चेंडूंत २६ धावा करून ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला.  सूर्यकुमार यादवने मुंबई इंडिन्ससाठी खिंड लढवली. ८व्या षटकात युजवेंद्र चहलने त्याला LBW केले होते, पण मैदानावरील अम्पायरने नाबाद दिले आणि अम्पायर कॉलमुळे तो नाबाद राहिला. 


मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये त्याने २००० धावा पूर्ण केल्या. सूर्याने ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. चेंडू लागल्याने अंगठ्याला दुखापत होऊनही सूर्यकुमार खेळपट्टीवर नांगर रोवून उभा राहिला. त्याला १९ वर्षीय तिलक वर्माची ( Tilak Varma) चांगली साथ मिळाली. चहलनेच MIच्या सूर्यकुमारची विकेट घेतली. रियान परागने सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. सूर्यकुमार ३९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५१ धावांवर माघारी परतला. त्याच्या पुढील षटकात प्रसिद्ध कृणाने दुसरा सेट फलंदाज तिलक वर्मा ( ३५) याला बाद केले. पुन्हा रियान परागने झेल टिपला. (Two quick wickets for Rajasthan Royals, both the set men Surya and now Tilak Varma goes.) 

टीम डेव्हिड व किरॉन पोलार्ड या नव्या जोडीवर दडपण वाढलेले दिसले, पण काही चेंडू खेळून काढल्यानंतर डेव्हिडने षटकार खेचून ते दडपण थोडे कमी केले. चहलने ३३ धावांत १ विकेट घेतली. आर अश्विनने २१ धावांत १ बळी टिपला. मुंबईला १८ चेंडूंत २५ धावा करायच्या होत्या. डेव्हिडने १८व्या षटकात १३ धावा चोपल्या आणि आता सामना १२ चेंडूत १२ धावा असा बरोबरीचा आला. अखेरच्या षटकात मुंबईला ४ धावा करायच्या होत्या अन् ट्रेंट बोल्टची एक ओव्हर शिल्लक असूनही कुलदीप सेनवर RRने विश्वास दाखवला. त्याने पहिल्याच चेंडूवर पोलार्डला  ( १०) माघारी पाठवले. पण, डॅनिएल सॅम्सने षटकार खेचून मुंबईचा पहिला विजय पक्का केला. 

दरम्यान राजस्थान रॉयल्सच्या देवदत्त पडिक्कलला ( १५) जीवदान मिळवूनही मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार संजू सॅमसन ( १६), डॅरील मिचेल ( १७) हेही अपयशी ठरले. त्यामुळे अन्य फलंदाजांवर दडपण वाढले. जोस बटलर खेळपट्टीवर होता, परंतु मुंबईच्या गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यासमोर त्याला धावा करता आल्या नाही. बटलरने ५२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावा केल्या. रियान पराग ( ३) अपयशी ठरल्यानंतर आर अश्विनने ९ चेंडूंत २१ धावा करून योगदान दिले. शिमरोन हेटमायरने १४ चेंडूंत ६ धावा केल्याने RRच्या धावा कमी राहिल्या.  रिले मेरेडिथने अखेरचे षटक चांगले फेकले, अश्विनच्या विकेटसह त्याने केवळ ३ धावा दिल्या. राजस्थानला ६ बाद १५८ धावाच करता आल्या.  मरेडिथने  व हृतिक शोकीनने यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

Play Off चं समीकरण....
मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकून गुणखाते उघडले असले तरी ते १०व्या क्रमांकावरच राहणार आहेत. चेन्नई सुपर किंग्स ४ गुणांसह ९व्या क्रमांकावर आहेत. सलग ८ सामने गमावल्यामुळे मुंबई  इंडियन्सचे प्ले ऑफचे आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत गुजरात टायटन्स ( १४), राजस्थान रॉयल्स ( १२), लखनौ सुपर जायंट्स ( १२), सनरायझर्स हैदराबाद ( १०) व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( १०) हे आघाडीवर आहेत. 

Web Title: IPL 2022, MI vs RR Live Updates : Mumbai Indians registered first win after 8 defeat, beat Rajasthan Royals by 5 wickets; know about their play off chance 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.