IPL 2022, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत चांगली कामगिरी केली. सुरुवातीच्या षटकांत RRच्या सलामीवीरांचे झेल सोडल्यानंतरही MIच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले. फॉर्मात असलेल्या जोस बटलरलाही ( Jos Buttler) त्यांनी जखडून ठेवले होते. राजस्थानला ६ बाद १५८ धावाच करता आल्या. पदार्प आज पदार्पण करणाऱ्या कुमार कार्तिकेयने ( १-१९) RRच्या धावा रोखल्या. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर रोहित शर्मा व इशान किशन यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. पण, बर्थ डे बॉय रोहित ( Rohit Sharma Birthday) २ धावांवर माघारी परतला. आर अश्विनने त्याला फिरकीच्या जाळ्यात अडकवले.
देवदत्त पडिक्कलला ( १५) जीवदान मिळवूनही मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार संजू सॅमसन ( १६), डॅरील मिचेल ( १७) हेही अपयशी ठरले. त्यामुळे अन्य फलंदाजांवर दडपण वाढले. जोस बटलर खेळपट्टीवर होता, परंतु मुंबईच्या गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यासमोर त्याला धावा करता आल्या नाही. रियान पराग ( ३) अपयशी ठरल्यानंतर आर अश्विनने ९ चेंडूंत २१ धावा करून योगदान दिले. शिमरोन हेटमायरने १४ चेंडूंत ६ धावा केल्याने RRच्या धावा कमी राहिल्या. रिले मेरेडिथने अखेरचे षटक चांगले फेकले, अश्विनच्या विकेटसह त्याने केवळ ३ धावा दिल्या. राजस्थानला ६ बाद १५८ धावाच करता आल्या. मरेडिथने दोन व हृतिक शोकीनने दोन विकेट्स घेतल्या.
इशान किशनने थर्ड मॅनला षटकार खेचून MIच्या चाहत्यांना आश्वासक चित्र दाखवले, परंतु तिसऱ्याच षटकात आर अश्विनला गोलंदाजीला आणून RR ने मोठा डाव खेळला. अश्विनने फिरकीच्या जाळ्यात रोहितला अडकवले आणि डॅरील मिचेलने सोपा झेल घेत त्याला २ धावांवर माघारी पाठवले. रोहितच्या विकेटनंतर त्याची पत्नी रितिका सजदेह निराश झाली आणि शेजारीच सेलिब्रेशन करत असलेली अश्विनची पत्नीने तिचे मिठी मारून सांत्वन केले. किशन १८ चेंडूंत २६ धावा करून ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला.
पाहा रोहित शर्माची विकेट...
रोहितचा खराब फॉर्म हा मुंबई इंडियन्ससाठी चिंतेचा विषय बनला आहे.
Web Title: IPL 2022, MI vs RR Live Updates : Ravi Ashwin strikes in his first over and gets Rohit Sharma for just 2, see Ritika Sajdeh reaction, Ashwin wirfe to to hug her, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.