IPL 2022, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत चांगली कामगिरी केली. सुरुवातीच्या षटकांत RRच्या सलामीवीरांचे झेल सोडल्यानंतरही MIच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले. फॉर्मात असलेल्या जोस बटलरलाही ( Jos Buttler) त्यांनी जखडून ठेवले होते. त्याने आयपीएलमधील सर्वात संथ अर्धशतक आज झळकावले. राजस्थानला ६ बाद १५८ धावाच करता आल्या. पदार्प आज पदार्पण करणाऱ्या कुमार कार्तिकेयने ( १-१९) RRच्या धावा रोखल्या. पण, त्याने आजच्या सामन्यात केलेली अजब मागणी चर्चेत आली.
देवदत्त पडिक्कलला ( १५) जीवदान मिळवूनही मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार संजू सॅमसन ( १६), डॅरील मिचेल ( १७) हेही अपयशी ठरले. त्यामुळे अन्य फलंदाजांवर दडपण वाढले. जोस बटलर खेळपट्टीवर होता, परंतु मुंबईच्या गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यासमोर त्याला धावा करता आल्या नाही. रियान पराग ( ३) अपयशी ठरल्यानंतर आर अश्विनने ९ चेंडूंत २१ धावा करून योगदान दिले. शिमरोन हेटमायरने १४ चेंडूंत ६ धावा केल्याने RRच्या धावा कमी राहिल्या. रिले मेरेडिथने अखेरचे षटक चांगले फेकले, अश्विनच्या विकेटसह त्याने केवळ ३ धावा दिल्या. राजस्थानला ६ बाद १५८ धावाच करता आल्या. मरेडिथने दोन व हृतिक शोकीनने दोन विकेट्स घेतल्या.
१४व्या षटकात कुमार कार्तिकेय याने अम्पायरला साईड स्क्रीनवरील TATA PUNCH ची जाहीरात झाकण्याची विनंती केली. फलंदाजाच्या समोरील साईड स्क्रीन झाकली जाते, पण गोलंदाजाने अशी मागणी करताच अम्पायरची चाचपडले. रोहित शर्मानेही त्याबाबद अम्पायरकडे विचारणा केली. या सर्व प्रसंगामुळे काही काळ सामना थांबवावा लागला.
Web Title: IPL 2022, MI vs RR Live Updates : Seems like Kumar Kartikeya is asking for the sight screen advert behind the batter be switched off
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.