Join us  

Jasprit Bumrah IPL 2022 MI vs SRH Live Updates : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने SRHच्या 'डेंजर' फलंदाजाला दिले जीवदान, जसप्रीत बुमराहचे डोके फिरले

IPL 2022 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Updates : सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात प्रियांम गर्ग व फझलहक फारुकी यांना संधी मिळाली आहे. आज प्रियाम व अभिषेश शर्मा ओपनिंगला येणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 8:11 PM

Open in App

IPL 2022 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Updates : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून मयांक मार्कंडे व संजय यादव यांना आज प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात प्रियांम गर्ग व फझलहक फारुकी यांना संधी मिळाली आहे. आज प्रियाम व अभिषेश शर्मा ओपनिंगला येणार आहे. मुंबई इंडियन्सचे ( MI ) स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. पण, मुंबईच्या आजच्या सामन्यातील विजयावर अन्य संघांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे MI ची प्रत्येकी चूक RCB, DC, PBKS यांना महागात पडणारी ठरणार आहे. फॉर्मात असलेला अभिषेक शर्मा ( ९)  तिसऱ्या षटकात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.

डॅनिएल सॅम्सने MI ला ही विकेट मिळवून दिली. त्यानंतर प्रियांम गर्ग व राहुल त्रिपाठी यांनी आक्रमक खेळ केला. फॉर्माशी झगडणाऱ्या त्रिपाठीने जसप्रीत बुमराहच्या एका षटकात ६ ,४ ,४ अशा फटकेबाजीने सुरुवात केली. आज ओपनिंगला आलेल्या गर्गनेही मुंबईच्या गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. ६व्या षटकात गर्गला बाद करण्याची आयती संधी चालून आली होती. डॅनिएल सॅम्सच्या गोलंदाजीवर गर्गने फाईन लेगच्या दिशेने उत्तुंग फटका मारला. जसप्रीत बुमराह जीव तोडून कॅच टिपण्यासाठी धावत सुटला. पण, संजय यादव तो झेल टिपण्यासाठी आधीच उभा होता आणि हे बुमराहच्या फार उशीरा लक्षात आले.  ( पाहा IPL 2022 - MI vs SRH सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

संजय यादवच्या जवळ पोहोचताच तो थांबला, परंतु यादवने सोपा झेल टाकला. जसप्रीत त्याच्यावर भडकलेला दिसला. गर्गला १० धावांवर जीवदान मिळाले आणि त्यानंतर त्याने दोन खणखणीत षटकारही खेचले. गर्ग व त्रिपाठी यांनी २९ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. 

सनरायझर्स हैदराबाद - अभिषेक शर्मा, प्रियाम गर्ग, केन विलियम्सन, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, टी नटराजन, फझलहक फारुकी  

मुंबई इंडियन्स - इशान किशन, रोहित शर्मा, त्रिस्तान स्टुब्ब्स, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, डॅनिएल सॅम्स, रमणदीप सिंग, संजय यादव, जसप्रीत बुमराह, मयांक  मार्कंडे, रिली मेरेडिथ  

टॅग्स :आयपीएल २०२२जसप्रित बुमराहमुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबाद
Open in App