Rahul Tripathi IPL 2022 MI vs SRH Live Updates : राहुल त्रिपाठीसह SRHच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा घाम काढला; धावांचा डोंगर उभा केला

IPL 2022 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Updates : ओपनिंग जोडी बदलणे आज सनरायझर्स हैदराबादच्या पथ्यावर पडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 09:24 PM2022-05-17T21:24:01+5:302022-05-17T23:04:21+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 MI vs SRH Live Updates : Rahul Tripathi - 76 (44), Nicholas Pooran 38 ( 22), Priyam Garg 42 ( 26); Mumbai needs 194 runs to knock SRH out | Rahul Tripathi IPL 2022 MI vs SRH Live Updates : राहुल त्रिपाठीसह SRHच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा घाम काढला; धावांचा डोंगर उभा केला

Rahul Tripathi IPL 2022 MI vs SRH Live Updates : राहुल त्रिपाठीसह SRHच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा घाम काढला; धावांचा डोंगर उभा केला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Updates : ओपनिंग जोडी बदलणे आज सनरायझर्स हैदराबादच्या पथ्यावर पडले. अभिषेक शर्मा अपयशी ठरला, परंतु त्याच्या जोडीला आलेल्या प्रियाम गर्गने ( Priyam Garg ) अफलातून खेळी केली. राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) आणि निकोलस पूरन ( Nicholas Pooran) यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करताना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना पळता भुई करून सोडले... १८व्या षटकात रमणदीप सिंगने दोन धक्के दिल्याने SRHच्या धावगतीला ब्रेक लागला खरा, परंतु तोपर्यंत MI समोर धावांचा डोंगर उभा राहिला होता. ( पाहा IPL 2022 - MI vs SRH सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

फॉर्मात असलेला अभिषेक शर्मा ( ९)  तिसऱ्या षटकात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. डॅनिएल सॅम्सने MI ला ही विकेट मिळवून दिली. त्यानंतर प्रियांम गर्ग व राहुल त्रिपाठी यांनी आक्रमक खेळ केला. फॉर्माशी झगडणाऱ्या त्रिपाठीने जसप्रीत बुमराहच्या एका षटकात ६ ,४ ,४ अशा फटकेबाजीने सुरुवात केली. आज ओपनिंगला आलेल्या गर्गनेही मुंबईच्या गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. ६व्या षटकात गर्गला बाद करण्याची आयती संधी चालून आली होती. पण, संजय यादव झेल सोडला. गर्गला १० धावांवर जीवदान मिळाले आणि त्यानंतर त्याने दोन खणखणीत षटकारही खेचले. 

मुंबईच्या खेळाडूंच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचाही या जोडीला फायदा मिळताना दिसला. कॅप्टन रोहित शर्मा मात्र खेळाडूंच्या कामगिरीवर नाराज दिसला. गर्ग व त्रिपाठी यांची ४३ चेंडूंवर ७८ धावांची भागीदारी १०व्या षटकात संपुष्टात आली. रमणदीप सिंगने स्वतःच्याच गोलंदाजीवर अफलातून परतीचा झेल टिपला. गर्ग २६ चेंडूंत  चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर माघारी परतला. SRH ने पहिल्या १० षटकांत  २ बाद ९७ धावा केल्या. त्रिपाठी व निकोलस पूरन यांनी फटकेबाजी पुढेही कायम राखली. त्रिपाठीने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्रिपाठी व पूरन यांनीही २९ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. त्रिपाठी आज कोणाला जुमानत नव्हता डॅनिएल सॅम्सने टाकलेल्या १६ व्या षटकात त्याने मारलेला उत्तुंग षटकार प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेला.

 
१७व्या षटकात SRHची सेट झालेली भागीदारी संपुष्टात आली. पूरन २२ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारासह ३८ धावांवर बाद झाला. मयांक मार्कंडेने सुरेख झेल टिपला. पुढच्याच षटकात रमणदीपने आणखी एक  सेट फलंदाज माघारी पाठवला. त्रिपाठी ४४ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावांवर बाद झाला. पूरन व त्रिपाठी यांनी ४२ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली. त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एडन मार्कराम ( २) बाद झाला. सॅम्स ( १-३९) व रिले मेरेडिथ ( १-४४) यांची चार षटकं महागडी ठरली. रमणदीपने ३ षटकांत २० धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. हैदराबादने ६ बाद १९३ धावा केल्या. 

Web Title: IPL 2022 MI vs SRH Live Updates : Rahul Tripathi - 76 (44), Nicholas Pooran 38 ( 22), Priyam Garg 42 ( 26); Mumbai needs 194 runs to knock SRH out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.