Join us  

IPL 2022: Moeen Ali आज नाही आला, तर पहिल्या सामन्याला मुकला; आणखी दोन प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत कशी असेल CSK ची playing XI?

IPL 2022: Moeen Ali will be out of IPL : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला शनिवारपासून सुरूवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 12:15 PM

Open in App

IPL 2022: Moeen Ali will be out of IPL : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला शनिवारपासून सुरूवात होणार आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स ( CSK vs KKR) यांच्यातल्या सामन्याने वानखेडे स्टेडियमवरून IPL 2022 ला सुरूवात होणार आहे. पण, CSK ची डोकेदुखी काही कमी झालेली नाही. १४ कोटींचा गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाही आणि अष्टपैलू मोईन अली ( Moeen Ali) व्हिसा न मिळाल्याने अजूनही मुंबईत दाखल झालेला नाही. मोईन अली आज जर मुंबईत दाखल न झाल्यास, तो पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता मावळणार आहे.  

  • २६ मार्चला आहे पहिला सामना ( CSK vs KKR 1st match ) शनिवारी मोईन अली याला बुधवारी मुंबईत दाखल व्हावे लागणार आहे, त्यानंतर तीन दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून तो पहिल्या सामन्यासाठी मैदानावर उतरू शकतो.  
  • प्रत्येक परदेशी खेळाडूला आयपीएल बायो बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तीन दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.   
  • मोईन अलीच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हॉन कॉनवे याला  आयपीएल पदार्पणाची संधी मिळू शकते. मोईन अलीच नव्हे तर भारताला दीपक चहर व ड्वेन प्रेटोरियस या खेळाडूंशिवाय प्लेइंग इलेव्हन मैदानावर उतरवावी लागेल.

 

  • मोईन अली - व्हिसा समस्या
  • दीपक चहर - दुखापतग्रस्त
  • ड्वेन प्रेटोरियस - बांगलादेशविरुद्धची मालिका 

  चेन्नई सुपर किंग्स Playing XI विरुद्ध KKR ऋतुराज गायकवाडडेव्हॉन कॉनवे रॉबिन उथप्पाअंबाती रायुडू रवींद्र जडेजा शिवम दुबेड्वेन ब्राव्होमहेंद्रसिंग धोनी ख्रिस जॉर्डनअॅडम मिल्नेप्रशांत सोलंकी 

 

अपडेट्स- मोईन अली पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे #CSK चे CEO काशी विश्वनाथ यांनी जाहीर केले. अद्याप त्याला व्हिसा मिळालेला नाही आणि तो कधी मिळेल, याबाबत अजूनही स्पष्टता मिळालेली नाही. #MoeenAli

टॅग्स :आयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App