IPL 2022 मध्ये CSKच्या हंगामाची सुरूवात पराभवाच्या धक्क्याने झाली. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले आणि रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाला सलामीला पराभूत व्हावे लागले. महेंद्रसिंग धोनी हा CSKचा सुरुवातीपासून कर्णधार होता. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याची इच्छा असलेले अनेक खेळाडू आहेत. असाच एक न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे आहे. तो यंदा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. चेन्नई सुपर किंग्सने डेव्हन कॉनवेचा एक व्हिडिओ ट्वीट केला, ज्यामध्ये त्याने धोनीशी संबंधित एक किस्सा सांगितला.
न्यूझीलंडच्या कॉनवे म्हणाला, मला एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळायचे होते. मी त्याच्याशी बोललो. मी त्याला सांगितलं की तू आणखी एका हंगामासाठी कर्णधार म्हणून कायम राहा. त्यावर धोनी म्हणाला की, मी कर्णधार नसलो म्हणून काय झालं, पण मी सदैव आसपासच राहीन. पुढे डेव्हॉन कॉनवे म्हणाला की, मी रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनीसोबत गप्पा मारल्या. दोघांबरोबर जेवलो. दोघेही खूप खेळकर आहेत. त्यांच्यासोबत बसून, गप्पा मारून खूप छान वाटलं.
दरम्यान, एमएस धोनीने या आयपीएल सुरू होण्याच्या दोन दिवस आधी कर्णधारपद सोडले. एमएस धोनीने रवींद्र जडेजाला आपला उत्तराधिकारी बनवले. पण कर्णधार म्हणून रवींद्र जाडेजाचा पहिला सामना फारसा चांगला गेला नाही. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागला.