MS Dhoni Virat Kohli IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये मंगळवारी चेन्नई सुपर किंग्सने ( CSK) अखेर पहिल्या विजयाची नोंद केली. रॉबिन उथप्पा व शिवम दुबे यांच्या १६५ धावांच्या भागीदारीनंतर माहीश थिक्साना व रवींद्र जडेजा यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची ( RCB) चांगली फिरकी घेतली. चेन्नईने विजयासाठी ठेवलेल्या २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूला ९ बाद १९३ धावा करता आल्या.
चेन्नईच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या RCBला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चतुराईने रोखले. रवींद्र जडेजा पुन्हा एकदा नावाचा कर्णधार ठरला, प्रत्यक्षात मैदानावर धोनीच डावपेच आखताना दिसला. RCBचा स्टार फलंदाज विराट कोहलीला रोखण्यासाठी धोनीने सापळा रचला आणि तो यशस्वी ठरला. विराट १ धाव करून बाद झाला. विराट फलंदाजी करत असताना धोनीने शिवम दुबेला फाईन लेगवरून डीप स्क्वेअर लेगला हलवले आणि विराटला जाळ्यात अडकवले. पुढच्याच चेंडूवर विराटने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू भिरकावला आणि दुबेने अचूक टिपला. RCBला मोठा धक्का बसला.
ऋतुराज गायकवाड ( 17) व मोईन अली ( 3) झटपट माघारी परतल्याने चेन्नईची अवस्था 2 बाद 36 अशी झाली. रॉबिन उथप्पा व शिवम दुबे यांनी ७४ चेंडूंत १६५ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे चेन्नईने अखेरच्या १० षटकांत १५०+ धावा कुटल्या. उथप्पा 50 चेंडूंत 4 चौकार व 9 षटकारांसह 89 धावांवर बाद झाला. दुबे 46 चेंडूंत 5 चौकार व 8 षटकारांसह 95 धावांवर नाबाद राहिला. चेन्नईने 4 बाद 216 धावा केल्या.
माहीश थिक्सानाने प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या RCBला ३३ धावांत ४, रवींद्र जडेजाने ३९ धावांत ३ धक्के दिले. ग्लेन मॅक्सवेल २६ धावा, सुयष प्रभुदेसाई १८ चेंडूंत ३५ व शाहबाज अहमद २७ चेंडूंत ४१ धावा केल्या. दिनेश कार्तिकने १४ चेंडूंत ३४ धावा केल्या. पण, आरसीबीला ९ बाद १९३ धावांवर समाधान मानावे लागले.
Web Title: IPL 2022: MS Dhoni sets a deep square leg for Virat Kohli; batter gets caught in the same area next ball Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.