इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील उर्वरित सामने १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत यूएई येथे खेळवण्यात येणार आहेत. त्यात बीसीसीआयनं आयपीएल २०२२ची तयारी सुरू केली आहे. आयपीएलच्या पुढील पर्वात दोन नवीन संघांचा समावेश करण्यात येणार असल्यामुळे मेगा ऑक्शन होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयनं नियमावली तयार केली असून प्रत्येक फ्रँचायझीला फक्त चार खेळाडूंनाच संघात कायम राखता येणार आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) सह अन्य संघ कोणत्या चार प्रमुख खेळाडूंना कायम राखते याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्यात आता पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
IPL Format Change: इंडियन प्रीमिअर लीगच्या फॉरमॅटमध्ये मोठे बदल, बीसीसीआयला ८०० कोटींचा फायदा!
माहीचा सध्याचा फॉर्म पाहता तो आयपीएल २०२२ खेळण्याची शक्यता फार कमी आहे, असा अंदाज बांधला जात आहे. पण, याबाबत कोणीच ठाम सांगू शकत नाही. धोनी CSKच्या प्रशिक्षक किंवा मेंटॉरच्या भूमिकेतही दिसू शकतो, असा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत. CSKनं २०२२मध्येही धोनी संघाचा सदस्य असेल असे आधीच जाहीर केले असले तरी तो नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसेल याबाबत संभ्रम आहे. आयपीएल २०२०त धोनीच्या नेतृत्वाखाली CSKला प्ले ऑफमध्येही प्रवेश करता आलेला नव्हता. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच CSKला हे अपयश आले. आयपीएल २०२१त मात्र CSKनं आतापर्यंत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.
कोणत्या चार खेळाडूंना CSK कायम राखणार?बीसीसीआयच्या नियमानुसार आयपीएल २०२२ साठी चार खेळाडूंना कायम राखता येणार आहे. त्यात तीन भारतीय व एक परदेशी किंवा दोन भारतीय व दोन परदेशी असा पर्याय देण्यात आला आहे. CSKच्या सध्याच्या संघातील खेळाडूंवर लक्ष टाकल्यास ३+१ फॉर्म्युल्यानुसार धोनी, सुरेश रैना, ऋतुराज गायकवाड आणि फॅफ ड्यू प्लेसिस किंवा २+२ फॉर्म्युल्यानुसार धोनी व ऋतुराज आणि फॅफ व सॅम कुरन/मोईन अली असे पर्याय समोर येत आहेत. जर धोनीला खेळाडू म्हणून कायम न राखले तर तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसू शकतो. CSKचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी CSK धोनीला रिटेन केले जाईल असे संकेत दिले आहेत आणि तसे झाल्यास तो कर्णधार म्हणूनच संघासोबत कायम राहिल.
ब्रॅड हॉज काय म्हणतोय?ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉज म्हणाला की, धोनी चेन्नईकडून खेळाडू म्हणून नाही खेळला तर तो प्रशिक्षक म्हणून दिसू शकतो.